Latest Marathi News Live : कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पदभार स्वीकारला
esakal April 24, 2026 05:45 PM
Kolhapur Live: कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून निलोत्पल यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागांची सविस्तर पाहणी करत कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती सध्या घेत असल्याचे सांगितले. पडद्यामागे राहून काम करण्याची आपली पद्धत असल्याचे नमूद करत कोल्हापूरमध्ये प्रभावी कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांच्याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीची माहिती अद्याप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊनच पुढे प्रतिक्रिया देऊ असे सांगितले. तसेच या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातला ०३ दिवसांची पोलीस कोठडी

२६ एप्रिलपर्यंत अशोक खरातचा मुक्काम असणार पोलीस कोठडीत

सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातवर बलात्कार आणि विधीच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

पाण्यात मिसळलेले गुंगीकारक औषध, खायला दिलेले पदार्थ आणि आर्थिक फसवणूकीबाबत तपास करण्यासाठी झाली होती पोलीस कोठडीची मागणी

तेच पेढे, तेच पाणी पुन्हा पुन्हा तोच तपास का? आरोपीला SIT समोर बसून ठेवण्यात आनंद मिळतो का? असा घेतला आक्षेप

आंबेनळी घाटात भीषण अपघात, ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू

आंबेनळी घाटात ९०० फूट दरीत कोसळून दांपत्याचा मृत्यू

मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे बचावकार्य कठीण

पोलिस व बचाव पथकाची धाडसी मोहीम

घाट रस्त्यांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

मानव वन्यजीव संघर्षावर तारु उद्यानाचा उतारा, नवी संकल्पना अस्तित्वात

ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाने तारु उद्यान ही नवी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय. याचा पहिला प्रकल्प ताडोबाच्या भामडेळी गावात सुरू करण्यात आला. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्या संकल्पनेतून 'तारू उद्यान' ही संकल्पना समोर आली.

Maharashtra Live: सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा कट उधळला, नऊ संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांकडून अटक

- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई

- मुंबई ते सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये होणाऱ्या दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला

- दरोडाच्या प्रयत्नात असणाऱ्या संशयित नऊ महिला आरोपींना पोलिसांकडून अटक

- बुधवारी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर सीपीडीएस पथकाने केली कारवाई

- सदरची महिलांची टोळी सोलापूर व पुणे विभागात सक्रिय असल्याची शक्यता

- पुढील कारवाईसाठी आरोपींना लोहमार्ग पोलीस कुर्डूवाडी च्या ताब्यात देण्यात आल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहेत

Pune Live: कोथरुडमधील ‘निर्वाण बिहार’ सोसायटीत गुंडाची दहशत

कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

छतावर अनधिकृत कबुतरखाना आणि अंमली पदार्थांचे सेवन,

रहिवाशांची पोलिसांत धाव

कबुतराची ढाबळ पोलिसांनी तोडली

Shahada Live: शहादाच्या प्रकाशा येथे अवैध एचटीबीटी कापूस बियाण्यांवर कारवाई

शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत एक लाखांहून अधिक किमतीचे अवैध एचटीबीटी बोगस कापूस बियाणे जप्त केले आहे.

गुजरातमधून बेकायदेशीररीत्या आणून विक्रीसाठी ठेवलेले हे बियाणे जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Beed Live: बीडमध्ये शेतातील गवत जाळल्यामुळे कारला आग लागली, मोठं नुकसान

बीडच्या आष्टी तालुक्यातील जामगाव ते हरिनारायण आष्टा रस्त्यावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील बांधावर गवत जाळले, आणि ही आग काही अंतरावर उभी असलेल्या कारपर्यंत पोहोचली.

त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्यामुळे कारलाही आग लागली. आग रौद्ररूप धारण केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला, पण तेव्हाच गाडीचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.

Pune Live : “कोंढवा बुद्रुक: अश्रफनगरमध्ये रात्री चोरट्यांचा धुडगूस, चारचाकी वाहनांची तोडफोड”

कोंढवा बुद्रुक येथील अश्रफनगर परिसरात रात्री अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत अनेक चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या घटनेत गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून काही वाहनांमधील महागडे टेप आणि साऊंड सिस्टीम चोरीस गेल्याच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.

पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे आंदोलन

पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे आंदोलन

काँग्रेस पक्षाविरोधात भाजपकडून पुण्यात आंदोलन

महिला विधेयकाला विरोध केल्यानंतर भाजप महिला मोर्चा पुण्यात आक्रमक

काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलनाला सुरुवात

जैन समाजाला कुठलंही आरक्षण नको, जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललीत गांधींची भूमिका

जैन समाजाला कुठलंही आरक्षण नको जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललीत गांधींची भूमिका

आम्हाला आर्थिक सक्षमता, शिक्षणाच्या सोई सुविधा मिळाव्या इतकीच आमची माफक अपेक्षा

मेरीटवरच विद्यार्थ्यांना शिक्षणात संधी मिळावी अशी जैन समाजाची भुमिका

आरक्षणासंदर्भात फक्त जैन समाजाची भूमिका आहे अल्पसंख्यांकाची भूमिका मांडण्याचा माझ्या अधिकार नाही

Nashik: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

Nashik: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

- नाशिकच्या इंदिरानगर परिसरात भीषण अपघात

- नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर अपघात

- दारूच्या बाटल्यांनी भरलेली कार अपघातग्रस्त, अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

- गाडीत एवढ्या दारूच्या बाटल्या कोणाच्या आणि कशासाठी याचा शोध सुरू

- पोलिसांकडून गाडी मालकाचा तपास सुरू, स्थानिकांमध्ये खळबळ

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गातील सावंतवाडीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

सिंधुदुर्गातील सावंतवाडीत काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह सावंतवाडी शहरात आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळला. पावसाचा आणि वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता, की संपूर्ण सावंतवाडी शहराची बत्ती गुल झाली होती. तर, अनेक ठिकाणी झाडे मोडून रस्त्यावर पडली. ही झाडे रस्त्यावरून हटविण्यात आली असून नागरिकांची मात्र गैरसोय झाली होती. दरम्यान, अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात अटक; आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात केले जाणार हजर

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरात याला विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी (ता. २३) सायंकाळी महिला अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात अटक केली. शुक्रवारी (ता. २४) त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Uday Samant News : शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

- शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

- धुळे जिल्ह्याची जबाबदारी दादा भुसे यांच्याकडे

- आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीला वेग

- नाशिक जिल्ह्यातील १२ ग्रामीण विधानसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करणार

- ३० एप्रिलला उदय सामंत यांचा नाशिक दौरा, बैठकीची तयारी

- पक्षात फेरबदल आणि नवीन नियुक्त्यांची शक्यता

Dhule Bar Association Election Voting : धुळे जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान; वन बार वन वोट निर्णय लागू

धुळे : जिल्हा वकील संघाच्या २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असून, यासाठी शुक्रवारी (ता. २४) मतदान होणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत सकाळी आठ ते सायंकाळी पाचदरम्यान अखंड मतदान प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकीसाठी ‘वन बार-वन वोट’ हा निर्णय लागू करण्यात आला असून, यासाठी सर्व उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. आनंद जगदेव, ॲड. मनोज देवरे, ॲड. राहुल अग्रवाल यांनी दिली.

IT Company Sexual Harassment Case : आयटी कंपनी लैंगिक अत्याचार प्रकरण; चार संशयितांना आज न्यायालयात हजर करणार

नाशिक : येथील बहुराष्ट्रीय टीसीएस आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवरील लैंगिक अत्याचार व धर्मांतराच्या प्रयत्नप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार संशयितांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी (ता. २३) सायंकाळी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा ताब्यात घेतले. तपासासाठी आवश्यक चौकशी करण्यासाठी या चौघांना शुक्रवारी (ता. २४) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

Legislative Assembly By-elections : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बारामतीत ५८.२७ टक्के तर राहुरीत ५६.२० टक्के मतदानाची नोंद

बारामती, अहिल्यानगर : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर बारामतीत सायंकाळी पाचपर्यंत ५८.२७ टक्के, तर राहुरी येथे ५६.२० टक्के मतदानाची नोंद झाली.

Voting in West Bengal and Tamil Nadu : पश्चिम बंगाल, तमिळनाडूत बंपर मतदान; सत्ताधारी तृणमूल काँग्रेससह 'द्रमुक'ची धाकधूक वाढली

Latest Marathi Live Updates 24 April 2026 : पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये बंपर मतदानाची नोंद झाल्याने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि ‘द्रमुक’ची धाकधूक वाढली आहे. बंगालमधील मतदानाचा हा पहिला टप्पा होता, येथे आणखी एका टप्प्यातील मतदान बाकी असून, बुधवारी (ता. २९) ते पार पडेल. बंगाली मतदारांनी ९२ टक्क्यांपर्यंतची मजल मारत इतिहास घडविला. तमिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात सर्व मतदान पार पडले. येथेही ८५.१३ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. कोइमतूर, मदुराई आणि चेन्नईसारख्या शहरी भागांतही मतदानाला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन्ही राज्यांमधील हे आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान आहे. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.