सूर्य कोपणार! पुढचे चार दिवस विदर्भात उष्णलहरींचा उद्रेक; हवामान विभागाकडून एलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
तुषार कोहळे April 24, 2026 04:13 PM

Heat Wave Weather Updates नागपूर : राज्यात उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून बहुतांश जिल्ह्यातील (Maharashtra Weather Update) तामानाने चाळीशी ओलांडली आहे. विशेषतः विदर्भात (Vidarbha Heat Wave) उष्णलहरींचा उद्रेक सुरूच असून विदर्भासाठी नागपूर वेध शाळेने परत एकदा उष्णतेच्या लाटेचा (Weather Updates) एलो अलर्ट (Yellow Alert) जाहीर केला आहे. (Maharashtra Weather Update) प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे चार दिवस अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा , चंद्रपूर या जिल्ह्यात तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या घरात राहणार असल्याचे नागपूर वेध शाळेने (IMD) सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारला घराबाहेर पडतांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. (Maharashtra Weather Update)

Weather Updates: संभाव्य उष्णतेची लाट लक्षात घेता सरकारकडून देखील ॲक्शन प्लॅन

दुसरीकडे संभाव्य उष्णतेची लाट लक्षात घेता सरकारकडून देखील ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. नागपूर आणि अमरावतीची बैठक घेतली. या दोन्ही बैठकींमध्ये जलसाठे जास्तीत जास्त मजबूत करणे, पाणी साठवून ठेवणे, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेणे, पाण्याची कपात करणे, अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शेतकरी आणि शहरातील जनतेला विनंती आहे की, पाणी यावर्षी जपून वापरायचे आहे, काटकसरीने पाणी वापरायचे आहे. प्रशासन तयार आहे. महाराष्ट्राची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली असून दुष्काळ परिस्थितीवर लक्ष आहे. असेही ते म्हणाले. (Maharashtra Weather Update)

Nagpur Weather : सिमेंट रोड, डांबरी रोड, इमारतीच्या छताचे तापमान हे जवळपास 60 अंश सेल्सिअस

सध्या विदर्भात उष्णतेची लाट सुरु आहे. काल (23 एप्रिल ) नागपूरचे तापमान 43.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हवामान विभाग हवेचे तापमान मोजून उष्णतेची गणना करते. मात्र नागरिकांना या पेक्षा जास्त तापमानाचे चटके बसतात. जेव्हा काल नागपूरचे तापमान 43.2 अंश सेल्सिअस होते, तेव्हा नागपूरच्या सिमेंट रोड, डांबरी रोड, इमारतीच्या छताचे तापमान हे जवळपास 60 अंश सेल्सिअस वर नोंदविले गेले. त्यामुळे विशेष करून शहरी व निमशहरी भागात नागरिकांना उष्णतेच्या लाटेचे अधिक चटके जाणवत असतात. हवामान विभागाने देखील हि बाब मान्य केली कि हवेच्या तापमानापेक्षा सरफेस एरियाचे तापमान 30 टक्य्यांपर्यंत अधिक असते. त्यामुळे नागरिकांना असाह्य उष्णतेच्या झळा सहन कराव्या लाग आहे.

Heat Wave: उष्णतेच्या लाटेचा रक्त पुरवठ्यावर परिणाम, जिल्हा सामान्य रुग्णालयात मर्यादित स्टॉक

वर्ध्यात वाढत्या तापमानाचा परिणाम रुग्णालयातील रक्तपुरवठ्यावर देखील जाणवायला लागला आहेय. उष्णतेची लाट वाढत असल्याने त्याचा फटका आता वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या रक्त पेढीवर झालाय. उन्हाळ्यामुळे रक्त दात्याची संख्या कमी झाल्याने रक्त पेढीतील स्टॉक मर्यादित आहे. वर्ध्यात असणाऱ्या सावंगी आणि सेवाग्राम येथील रुग्णालयात देखील रक्तपूरवठ्याची परिस्थिती बिकट आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.