Mumbai BMC veterinary officer accident Vikhroli details : वर्षभरापूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकून संसाराची नवी स्वप्ने पाहणाऱ्या एका तरुण अधिकाऱ्यावर काळाने घाला घातला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मानखुर्द पशुवधगृहात सेवा बजावणारे ३१ वर्षीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निवास थंगवेलू यादव यांचा अपघाती मृत्यू झाला. विक्रोळीत झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उमद्या अधिकाऱ्याचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई महानगरपालिकेचे ३१ वर्षीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निवास थंगवेलू यादव यांचा विक्रोळी येथील गांधीनगर जंक्शन येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. यादव हे दुचाकीवरून जात होते, त्यांना टेम्पोने जोरात धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. डॉ. निवास यादव हे मानखुर्द येथील देवनार पशुवधगृहात गेल्या १० ते १२ वर्षांपासून कार्यरत होते. मागील वर्षी त्यांचा विवाह झाला होता. पण संसार सुरू झाला असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी; प्रवाशांचे प्रचंड हालआज दुपारी डॉ. यादव हे आपल्या दुचाकीवरून विक्रोळीच्यागांधीनगर जंक्शन येथील पुलावरून जात असताना मागून येणाऱ्या एका आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बेंजामिन नेतान्याहू यांना ट्यूमर; इराणसोबतच्या हाय-व्होल्टेज चर्चेआधी पंतप्रधानांचा मेडिकल रिपोर्ट समोर; जगभरात खळबळया प्रकरणी विक्रोळीपोलिसांनी टेम्पो चालक गोविंद राजकुमार गिरी याच्यावर गुन्हा दाखल केल आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. डॉ. निवास यादव यांच्या निधनानंतर मानखुर्द आणि बीएमसीमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून टेम्पो चालकाला आणि अपघातग्रस्त वाहनाला ताब्यात घेतले आहे.
महिला भक्तावर बलात्कार, पश्चिम महाराष्ट्रातून भोंदू भोसले महाराजाला बेड्या, वाचा नेमकं प्रकरण काय?