आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शनिवारी 25 एप्रिल रोजी डबल हेडर खेळवण्यात येणार आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. राजस्थान आणि हैदराबाद या दोन्ही संघांचा हा या मोसातील सातवा सामना असणार आहे. राजस्थान या मोसमातील आतापर्यंत यशस्वी टीमपैकी आहे. त्यामुळे हैदराबाद राजस्थानला हल्ला बोल करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची मुद्दे जाणून घेऊयात.
युवा ऑलराउंडर रियान पराग राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करत आहे. तर पॅट कमिन्स राजस्थान विरूद्धच्या सामन्यातून नेतृत्वाची धुरा स्वीकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. पॅटला दुखापतीमुळे पहिल्या 6 सामन्यांना मुकावं लागलं. त्यामुळे पॅटच्या अनुपस्थितीत इशान किशन याने हैदराबादचं नेतृत्व केलं.
हैदराबादची कामगिरीइशानच्या नेतृत्वात हैदराबादची अडखळत सुरुवात झाली. मात्र इशानने त्यानंतर हैदराबादची घडी बसवली. हैदराबादची मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली. त्यानंतर हैदराबादने दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं. हैदराबादला त्यानंतर सलग 2 सामने गमवावे लागले. त्यानंतर हैदराबादने कमाल केली. हैदराबादने सलग 3 सामने जिंकलेत.
अशाप्रकारे इशानने त्याच्या कॅप्टन्सीत हैदराबादला एकूण 4 सामन्यांत विजयी केलं. तर हैदराबादचा 3 सामन्यांत पराभव झाला. इशानने कर्णधार म्हणून आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली आहे. त्यामुळे आता पॅट त्याच्या नेतृत्वात हैदराबादचा विजयरथ कायम ठेवण्यात यशस्वी ठरतो का याकडे ऑरेंज आर्मी चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कॅप्टन रियान परागचे आकडे कसे?तसेच रियान पराग याच्या नेतृत्वात राजस्थानने सलग 4 सामने जिंकत जबरदस्त कामगिरी केली. मात्र त्यानंतर राजस्थानची गाडी विजयी ट्रॅकवरुन घसरली. राजस्थानने सलग 2 सामने गमावले. त्यानंतर राजस्थानने पुन्हा विजय मिळवला. राजस्थानने अशाप्रकारे 7 पैकी 5 सामने आपल्या नावावर केलेत. तर 2 सामने गमावलेत. त्यामुळे आता शनिवारी होणाऱ्या सामन्यात कोणता संघ 2 गुणांची कमाई करणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
सामन्याबाबत महत्त्वाची माहितीराजस्थान विरुद्ध हैदराबाद सामना सवाई मानसिंह स्टेडियम, राजस्थान इथे होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल. उभयसंघातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.