Friends drowned in Sangli : सनमडी (ता. जत) येथे दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हर्षद संजय कांबळे (वय १६) आणि जगदीश वसंत मोरे (१५, रा. कुणीकोनूर, ता. जत) असे मृत मुलांची नावे आहे.
आज (शुक्रवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची उमदी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. हर्षद याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती, तर जगदीश नववीत शिक्षण घेत होता.
सनमडी येथील साठवण तलावाचा मत्स्य ठेका कुणीकोनूर येथील संजय कांबळे यांच्याकडे आहे. ते सीईटी परीक्षेसाठी मुलीला घेऊन विटा येथे गेले असताना मजूर मासेमारीसाठी गेला होता. त्याच्यासोबत हर्षद आणि त्याचा भाचा जगदीशही गेले होते. काठावर बसलेल्या मुलांपैकी एकाचा अचानक तोल जाऊन पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता उडी घेतली; मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते बुडाले. सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह जतग्रामीण रुग्णालयात आणले.
Sangli firing incident : सांगलीच्या राममंदिर चौकात गोळीबारचा थरार; मुलाच्या वाढदिवसाला न येण्याच कारण, मित्रानेच मित्राला घातली गोळी अन्...हद्दीच्या वादात हेलपाटे
या घटनेनंतर पोलिस व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाचा अनुभव नातेवाइकांना आला. ही घटना उमदीपोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह आणले, मात्र तेथे शवविच्छेदनासाठी कर्मचारी नसल्याने तेथून पुन्हा जत ग्रामीण रुग्णालयात नेला. यात वेळ गेल्याने विलंब झाला. जत ग्रामीण रुग्णालयातही उत्तरीय तपासणीसाठी कर्मचारी नव्हते. यामुळे नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली. पंचनाम्यातील त्रुटींवरही प्रश्न उपस्थित केले.