Latest Marathi News Live Update : आंबा बागायतदारांचा 15 मे रोजी 'वर्षा' बंगल्यापर्यंत धडक मोर्चा
esakal April 25, 2026 11:45 AM
Mumbai News : आंबा बागायतदारांचा 15 मे रोजी 'वर्षा' बंगल्यापर्यंत धडक मोर्चा

मुंबई : दोन महिन्यांपासून मदतीसाठी साकडे घालणाऱ्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी राज्य सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपये टाकून त्यांची थट्टा केली आहे. सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि हक्काची मदत मिळवण्यासाठी १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ''वर्षा'' बंगल्यापर्यंत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

MLA Sanjay Gaikwad : प्रकाशकाला दिलेल्या शिवीगाळबद्दल आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली दिलगिरी

Latest Marathi Live Updates 25 April 2026 : शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वादंग आणि त्यासंबंधी एका व्हायरल फोन कॉलमधून प्रकाशकाला दिल्या गेलेल्या शिव्यांमुळे वातावरण तापलेले असताना पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून महिलांच्या शिवीगाळ प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, पुस्तकाच्या नावामधील छत्रपती शिवरायांच्या एकेरी उल्लेखाबद्दल आक्षेप कायम असल्याचे सांगितले. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.