हॉर्सेन्स (डेन्मार्क) : थायलंड, बँकॉक येथे २०२२ मध्ये झालेल्या थॉमस बॅडमिंटन करंडकात पहिल्यांदाच विजेता होण्याचा मान संपादन केलेल्या भारताच्या पुरुष संघाने यंदाच्या मोसमात अ गटामध्ये पहिल्याच लढतीत कॅनडावर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला.
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने साखळी फेरीतील अ गटातील सुरुवात दणक्यात केली. भारताच्या महिला संघाला मात्र उबेर करंडकात डेन्मार्क संघाकडून ३-२ अशी हार पत्करावी लागली. अ गटातील पहिल्याच लढतीत महिला संघाकडून निराशा झाली. भारत-कॅनडा यांच्यामधील लढतीतील पहिल्या फेरीचा सामना लक्ष्य सेन-व्हिक्टर लेई यांच्यामध्ये रंगला.
IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवलाया फेरीमध्ये व्हिक्टर लेई याने लक्ष्य सेनवर १८-२१, २१-१९, २१-१० अशी तीन गेममध्ये मात केली. ही लढत एक तास व ११ मिनिटे रंगली. यानंतर सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या दुहेरीतील जोडीसमोर कॅनडाच्या जॉनाथन लेई-केव्हीन ली या जोडीचे आव्हान उभे ठाकले. या लढतीत भारतीय जोडीने २१-१०, २१-११ असा सरळ दोन गेममध्ये विजय साकारला व १-१ अशी बरोबरी साधली.
आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेल्या भारताच्या युवा आयुष शेट्टी याने एकेरीच्या लढतीत ब्रायन यंग याला अवघ्या ३९ मिनिटांमध्ये पराभूत केले. आयुष शेट्टी याने २१-१३, २१-१७ असा सहज विजय नोंदवला. या विजयामुळे भारताला २-१ अशी आघाडीही घेता आली.
हरीहरन अम्साकरुनन-एम. आर. अर्जुन या भारताच्या दुहेरीतील जोडीने निर्णायक विजय मिळवून दिला. हरीहरन अम्साकरुनन-एम. आर. अर्जुन या जोडीने टी. ॲलेक्झँडर लिंडमन- एन. याकुरा या जोडीवर २१-७, १-१५ अशी मात करताना उल्लेखनीय खेळ केला व भारताला ३-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या लढतीत किदांबी श्रीकांत याने जोशुआ एनगुयेन याला २१-१७, २१-१२ असे नमवले. या विजयासह भारताने ४-१ असा शानदार विजय साकारला.
Thomas Cup: थॉमस उबेर करंडकात भारताचा आजपासून कस! लक्ष्य सेन सिंधूवर मोठी जबाबदारी चीनकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वाचीनच्या पुरुष बॅडमिंटन संघाने अ गटातील अन्य लढतीत ऑस्ट्रेलियाचा ५-० असा धुव्वा उडवला. या विजयासह चीनने अ गटामधून पहिले स्थान मिळवले. भारतीय संघाने दुसरे स्थान मिळवले. गटातील अव्वल दोन देश उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहे. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी २७ एप्रिलला होणार आहे. भारताचा अखेरचा साखळी फेरीतील सामना २९ एप्रिल रोजी चीनशी रंगेल.