BMC Budget 2026-27 प्रदीर्घ चर्चांना आळा घालण्यासाठी नगरसेवकांकरिता 10 मिनिटांचा फॉर्म्युला लागू
Webdunia Marathi April 25, 2026 03:45 PM

मुंबई महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, महापौर रितू तावडे यांनी सर्वांना बोलण्याची संधी मिळावी यासाठी नगरसेवकांना आपले भाषण १० मिनिटांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.

ALSO READ: Maharashtra Medical Council Election: एमएमसी नऊ सदस्यांच्या निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार

मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) २०२६-२७ च्या अर्थसंकल्पासंदर्भात सभागृहात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, सर्व प्रतिनिधींना बोलण्याची समान संधी मिळावी यासाठी महापौर रितू तावडे यांनी सर्व नगरसेवकांना आपले भाषण जास्तीत जास्त १० मिनिटांत पूर्ण करण्याचे जोरदार आवाहन केले आहे.

९ एप्रिल रोजी सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय चर्चेत केवळ ४०-४२ नगरसेवकांनाच बोलण्याची संधी मिळाली आहे. परिणामी, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे अनेक सदस्य अजूनही आपल्या पाळीची वाट पाहत आहे. भाषणांचा कालावधी लांबल्यामुळे चर्चेची प्रक्रिया मंदावली आहे.

ALSO READ: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग बालविवाह रोखण्यासाठी विवाह पत्रिकांवर वधू आणि वर यांची जन्मतारीख छापण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारला करणार

प्रलंबित भाषणांची संख्या लक्षात घेता, भाजपने आगामी अधिवेशनात प्रत्येकाला संधी देण्यासाठी आपल्या सदस्यांसाठी '१०-मिनिटांचे सूत्र' लागू केले आहे. महापौर रितू तावडे यांनीही सर्व सदस्यांनी या वेळेच्या मर्यादेचे पालन करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहे.

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द: आरबीआयने बंद करण्याचे आदेश जारी केले, ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती


© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.