Thriller movie: ओटीटीवर सर्व्हायवल थ्रिलर चित्रपटांचा क्रेझ वेगळ्याच पातळीवर आहे. अशा प्रकारचा कोणताही चित्रपट रिलीज झाला की तो प्रेक्षकांमध्ये लगेच लोकप्रिय ठरतो. नुकताच प्रदर्शित झालेला एक सर्व्हायवल थ्रिलरही याच यादीत सामील झाला आहे. Netflix वर नुकताच एक नवा चित्रपट रिलीज झाला असून त्याची कथा अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे. अवघ्या 1 तास 36 मिनिटांचा हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
हा चित्रपट जंगलात राहणाऱ्या एका रॉक क्लाइंबरच्या भोवती फिरतो. स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात ती एका भयानक शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकते. अवघ्या दीड तासाच्या या चित्रपटाचा क्लायमॅक्स इतका जबरदस्त आहे की तो प्रेक्षकांना थक्क करून सोडतो.
या चित्रपटाचं नाव आहे Apex. ‘एपेक्स’ म्हणजे शिखर किंवा सर्वोच्च बिंदू. कथाही या शिखरापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासावर आधारित आहे. कथा साशा (Charlize Theron) हिची आहे, जी आपल्या पार्टनरच्या मृत्यूच्या अपराधीपणात जगत असते. दरम्यान, त्या परिसरात लोक अचानक बेपत्ता होण्याच्या घटना घडत असतात आणि एक दिवस ती स्वतःही त्या जाळ्यात अडकते. जंगल, नदी आणि एका सिरीयल किलरच्या सापळ्यात अडकलेली साशा स्वतःला कशी वाचवते, याभोवती कथा फिरते.
बालासर कोरमकूर या लोकप्रिय दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची कथा जरेमी रॉबिन्स यांनी लिहिली आहे. चित्रपटात चार्लीज थेरॉन सोबत टॅरोन एगरटन आणि एरिक बाना यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 24 एप्रिल रोजी Netflix वर प्रदर्शित झाला असून अवघ्या 24 तासांतच तो टॉप 10 यादीत ट्रेंड होऊ लागला आहे. जर तुम्ही सर्व्हायवल थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल, तर हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे.