Country without Railway Stations: या देशात नाही एकही रेल्वे स्टेशन, दळणवळणासाठी कशाचा करतात वापर?
admin April 25, 2026 06:25 PM
[ad_1]

Country Without Railway Stations: रेल्वेचा शोध लागल्यानंतर युरोपपासून तर जगाच्या कानाकोपऱ्यात इंग्रजांनी रेल्वे झपाट्याने नेली. कच्चा माल वेळेत पोहचावा आणि प्रशासकीय दृष्ट्या प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी इंग्रजांनी रेल्वेची सोय जगातील अनेक देशात केली. तर काही देशांनी स्वातंत्र्यानंतर रेल्वेचा विकास केला. रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण आणि रेल्वे स्टेशन उभारले. या देशांनी झटपट प्रगती केली. पण काही देशात आजही रेल्वे स्टेशन नाहीत. भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या याचा रेल्वेशी काहीच संबंध आलेला नाही. या देशात बस, कार, विमान सेवांचा दळणवळणासाठी वापर करण्यात येतो.

कोणते आहेत ते देश?

या यादीत सर्वात पहिले नाव भूतान या देशाचे आहे. भूतान हा देश हिमालयाच्या कुशीत आहे. येथील डोंगराळ रांगामुळे कोणतेही रेल्वे स्टेशन नाही. उंच डोंगर रांग आणि खोल दरी यामुळे रेल्वे ट्रॅक टाकणे येथे अधिक खर्चिक आणि भौगोलिकदृष्ट्या अधिक कसोटीचे काम आहे. त्यामुळे इथं प्रवासाठी सरकारी आणि खासगी वाहनांचा वापर करण्यात येतो.

तर फ्रान्स आणि स्पेन या देशा दरम्यान एंडोरा असा एक देश आहे की जिथे रेल्वे स्टेशन नाही. या देशाचा आकार फार छोटा आहे. अत्यंत डोंगराळ प्रदेश असल्याने या देशातही रेल्वे ट्रॅक नाही. या देशात जाण्यासाठी बस हाच एकमेव स्वस्त आणि वेगवान मार्ग आहे. शेजारील देशांतील नागरिकांना सुद्धा त्याचाच आधार घ्यावा लागतो.

युरोपातील ग्रीस शेजारील सायप्रस या देशात सुद्धा एकही रेल्वे स्टेशन नाही. अर्थात ब्रिटिशांचं राज्य होतं, तेव्हा इथं रेल्वेचे जाळं विणल्या गेलं होतं. रेल्वे सेवा सुद्धा बहाल होती. पण 20 शतकात अचानक ही व्यवस्था बंद झाली. 1905 आणि 1991 मध्ये येथे रेल्वे दळणवळण सुरू होते. पण आर्थिक अस्थिरता, विकासाला खीळ आणि इतर कारणांमुळे विकास झाला नाही. पुढे दळणवळणासाठी केवळ स्थानिक साधणांवर अवलंबून राहावे लागले. आता हा देश स्थानिक बस, टॅक्सी आणि खासगी कारवर निर्भर आहे.

आयसलँड या देशातही कोणतीही सार्वजनिक रेल्वे व्यवस्था नाही. ज्वालामुखीची जमीन, काही ठिकाणी बर्फाच्छादित भाग आणि घनदाट लोकवस्ती यामुळे या पट्ट्यात रेल्वेची सुविधा नाही. या देशातही बसचाच वापर होतो. माल्टा या देशातही अगोदर रेल्वे धावत होती. 1883 ते पुढे अनेक वर्ष रेल्वेचा प्रवास येथील लोकांनी आठवणीत साठवला आहे. पण आर्थिकदृष्ट्या रेल्वे चालवणे, देखभाल करणे अवघड होत असल्याने या देशात टॅक्सी, सरकारी बस आणि खासगी बसने प्रवास सुरू झाला.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.