RR vs SRH Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी (२५ एप्रिल) दोन सामने होत असून दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होत आहे. हा सामना राजस्थानच्या घरच्या मैदानात जयपूरला होत आहे.
दरम्यान, या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) मोठा बदल केला. हैदराबाद संघात त्यांचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) दुखापतीतून सावरून काही दिवसांपूर्वीच दाखल झाला आहे. त्यानंतर आता त्याने या सामन्यातून पुनरागमन केले आहे. तो परत आल्याने आता त्याने हैदराबाद संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही हाती घेतली आहे.
IPL 2026 : मुंबई इंडियन्स कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याची हकालपट्टी केव्हा करणार? दिग्गज खेळाडूचा थेट सवालया हंगामातील पहिल्या ७ सामन्यात ईशान किशनने (Ishan Kishan) कमिन्सच्या अनुपस्थितीत हैदराबाद संघाचे नेतृत्वपद सांभाळले होते. पण आता कमिन्स परत आल्याने त्याने पुन्हा नेतृत्वाची धुरा हाती घेतली. दरम्यान, ईशानने पहिल्या सात सामन्यात नाणेफेक गमावली होती. पण या सामन्यात कमिन्सने हैदराबादसाठी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेकीवेळी कमिन्सला पुनरागमन करण्याबद्दल विचारण्यात आले, त्यावेळी तो म्हणाला आता ताजेतवाने वाटत आहे. बराच काळापासून खेळलो नाही, पण तयारी चांगली केली आहे. खूप दिवस सामना खेळलो नाही, त्यामुळे पाहू काय होतंय. पण शरीर आता पूर्ण तंदुरुस्त असल्याचे दिसतंय.
यानंतर ईशान किशनच्या नेतृत्वाबाबत तो म्हणाला, 'त्याने शानदार नेतृत्व केले. पहिल्या ७ सामन्यांत चार विजय मिळवले. मला वाटतं तो त्याच शैलीत खेळला, जी शैली आम्ही आमच्या संघात रुजवण्याचा प्रयत्न करतोय - आक्रमक, निडर, अशी शैली.'
दरम्यान, या सामन्यासाठी हैदराबादने दोन बदल केले. मदुशंकाच्या जागेवर कमिन्सचे पुनरागमन झाले आहे. तसेच हर्ष दुबेच्या जागेवर प्रफुल हिंगेचे पुनरागमन झाले आहे. राजस्थान रॉयल्सनेही त्यांच्या संघात फारसा बदल केलेला नाही.
प्लेइंग इलेव्हन -सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे, ईशान मलिंगा
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - स्मरण रविचंद्रन, लियाम लिव्हिंगस्टोन, हर्ष दुबे, हर्षल पटेल, ट्रॅव्हिस हेड
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोव्हन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी बिश्नोई, रवी सिंग, संदीप शर्मा, शुभम दुबे
दोन्ही संघांचा हा ८ वा सामना आहे. राजस्थानने ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत. राजस्थान पाँइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहेत.
आमने-सामने आकडेवारीराजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आत्तापर्यंत २२ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १३ सामने हैदराबादने आणि ९ सामने राजस्थानने जिंकले आहेत.