Pune Crime : अंमली पदार्थ विक्रीतील रेकॉर्डवरील आरोपी शेरखान पठाण दोन वर्षांसाठी पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी-चिंचवड हद्दीतून तडीपार
esakal April 25, 2026 11:45 PM

लोणी काळभोर : अंमली पदार्थाची विक्री करणारा रेकॉर्डवरील आरोपी पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षे कऱीता हद्दपार करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी अंमली पदार्थाची विक्री करणारा रेकॉर्ड वरील आरोपी शेरखान सुधाखान पठाण (वय ५१, रा. किरण बेकरी जवळ लोणी स्टेशन, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) याला पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ पुणे शहर यांचे कार्यालयाकडून दोन वर्षांकरता पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश झाल्याने त्याला लोणी काळभोर पोलिसांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन सातारा येथे त्यांचे नातेवाईकांकडे ताब्यात देऊन तडीपार आदेशाची बजावणी केली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ६ राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त लोणी काळभोर, विभाग, अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर , पोलीस हवालदार विलास शिंदे, वैजिनाथ शेलार, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, योगिता भोसुरे सर्व नेमणूक, सर्वेलन्स विभाग लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांनी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.