MHADA: पुण्यात स्वस्तात मस्त घरं! अवघ्या १८ लाखात फ्लॅट; म्हाडाच्या २९५ घरांची विक्री, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया
Saam TV April 26, 2026 12:45 AM
  • MHADA कडून २९५ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

  • ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया ४ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे.

  • ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर आधारित आहे.

म्हाडा पुणेजिल्ह्यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर २९५ परवडणारी घरे विक्री करणार आहे. म्हाडाच्या म्हणण्यानुसार दोन लॉटरी फेऱ्यांनंतरही न विकलेली घरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) योजनेअंतर्गत विकली जात आहेत. या विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी म्हाडाचे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ हाताळले जाणार आहे. दरम्यान अगदी माफक दरामध्ये ही ही घरे मिळणार आहे. यासाठी कुठे आणि कशाप्रकार अर्ज करायचा ते जाणून घ्या.

Bharat Taxi: ओला उबरला देणार टक्कर! 'भारत टॅक्सी' सेवा मुंबईत सुरु; किती भाडे द्यावे लागणार? वाचा सविस्तर ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख

म्हाडाने जाहीर केले आहे की, नोंदणी प्रक्रिया ४ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होईल.

website: https://bookmyhome.mhada.gov.in.

जाहिरात येथे क्लिक करा.

या २९५ फ्लॅट्सपैकी ११३ पुणे महानगरपालिका (पीएमसी) म्हाडा योजनेअंतर्गत आणि १८२ पिंपरी-चिंचवड विभाग म्हाडायोजनेअंतर्गत आहेत. म्हाडाच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चिखली, ताथवडे, वाकड, लोहगाव, मुंडवा, येवलेवाडी, वाघोली, किवाळे, फुरसुंगी, दुदुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर, पुनावळे आणि इतर विविध भागांमध्ये 1RK, 1BHK, आणि 2BHK फ्लॅट्स उपलब्ध आहेत.

दरम्यान, प्रकल्पांनुसार आकार, किंमत आणि सुविधांमध्ये विविधता असल्याने अर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडण्याची मुभा असणार आहे. म्हाडा पुणे मंडळाकडून इच्छुक अर्जदारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली सविस्तर माहिती पुस्तिका पहावी, असं आवाहन केलं गेलं आहे.

या पुस्तिकेत योजनेबद्दल आणि अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. अर्जदारांनी त्याच वेबसाइटवरून आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे," असे म्हाडाने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान अपार्टमेंट खरेदी करू इच्छिणाऱ्या अर्जदारांना अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD) अगाऊ रक्कम भरावे लागेल. ही रक्कम 20,000 हजार निश्चित करण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.