AAP Action on Defected MPs : आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील ७ खासदारांनी काल अचानक पत्रकार परिषद घेत आपण सर्वजण भाजपत प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या कृतीमुळं देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यामध्ये राघव चढ्ढा आणि माजी क्रिकेटर हरभजन सिंग यांच्यासह इतर जणांचा समावेश होता. हे सर्वजणांना आपकडून पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. त्यामुळं पंजाब राज्यालाही मोठा झटका बसला आहे. पण आता या सर्वच्या सर्व खासदारांवर कारवाईसाठी आपनं पावलं उचलली आहेत. त्यामुळं हे खासदार अपात्र ठरणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
PMPML Bus Hijack : जंगली महाराज रोडवर भर गर्दीत बस हायजॅक करुन भरधाव पळवली! पुणेकरांनी अनुभवला सिनेस्टाईल थरार आपनं काय उचललं पाऊल?पक्षाला मोठं खिंडार पाडणाऱ्या आपल्या खासदारांच्या या कृतीमुळं आम आदमी पक्ष हा हादरला असून राज्यसभेत शिल्लक राहिलेल्या आपच्या ३ खासदारांपैकी एक असलेले संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बंडखोरी करणाऱ्या सातही खासदारांची सदस्यता रद्द करण्यासाठी राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णनं यांना पत्र लिहिणार असल्याचं म्हटलं आहे. हे सांगताना सिंह म्हणाले, "आम आदमी पार्टीचे ७ खासदार फुटले आहेत. हे बेकायदा, चुकीचं, असंविधानिक आणि संसदीय नियमाच्या उलट आहे. जो पक्षांतरबंदी कायदा आहे त्याच्या १०व्या शेड्युलमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे, की पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची फूट ही मान्य नाही. त्यामुळं भलेही दोन तृतीयांश खासदार फुटले असले तरी त्या कुठलीही वैधानिक मान्यता नाही. हे शिवसेनेच्या केसमध्ये देखील स्पष्ट झालं आहे. त्यामुळं मी आज राज्यसभेच्या सभापतींना तथा उपराष्ट्रपतींना या सर्व नियमांचा दाखला देत पत्र लिहिणार आहे की या सातही खासदारांची सदस्यता पूर्णतः रद्द केली जावी"
Prashant Padole : खासदार प्रशांत पडोळेंना अंधश्रद्धेचे डोहाळे! दैवी चमत्कारामुळं पळसाच्या झाडातून पाणी, नागरिकांना दर्शनासाठी बोलावलंअशा प्रकारे एका पक्षाकडून निवडून गेलेले असताना आणि ती टर्म सुरु असताना दुसऱ्या पक्षात प्रवेश करता येत नाही. कारण पक्षांतरबंदी कायद्याच्या शेड्युल १० नुसार अशा प्रकारे पक्षांतरावर बंदी आहे. अर्थात अशा केसमध्ये संबंधित खासदाराची सदस्यता रद्द केली जाते. पण हे पाऊल उचलताना आपच्या खासदारांनी कायदेशीर वैधतेचाही विचार केल्याचं दिसून आलं. कारण १० पैकी ७ जण म्हणजे दोन तृतीयांश संख्येचा हा खासदारांचा गट एकाच वेळी भाजपत विलीन झाला आहे. त्यामुळं पक्षांतरबंदी कायद्यानुसार, कुठल्याही सभागृहाचे दोन तृतीयांश सदस्य एकाचवेळी दुसऱ्या पक्षाला जाऊन मिळाले तर त्यांची सदस्यता रद्द होत नाही, असं सांगितलं जातं.