ज्येष्ठ नागरिकांसाठी सोपे व्यायाम प्रकार
Marathi April 26, 2026 07:25 AM

फिट आणि फाईन राहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य प्रकारचा व्यायाम केल्यास शरीर तंदुरुस्त राहते आणि आजारांपासून संरक्षणही मिळते आणि मनही प्रसन्न राहते. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार आणि आरोग्याच्या स्थितीनुसार व्यायाम निवडावा. नियमित व्यायामामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. पण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम सुरू करावा.

1. चालणे
सर्वात सोपा आणि सुरक्षित व्यायाम

रोज 20–30 मिनिटे चालणे फायदेशीर

हृदयाचे आरोग्य सुधारते

2. हलका योग
शरीर लवचिक राहते

तणाव कमी होतो

श्वसन सुधारते

3. प्राणायाम

फुफ्फुसांची क्षमता वाढते

मन शांत राहते

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत

4. स्ट्रेचिंग

स्नायू मोकळे राहतात

दुखापत होण्याचा धोका कमी

हालचाली सोप्या होतात

5. हलका  व्यायाम

हलक्या वजनांचा वापर

स्नायू मजबूत होतात

हाडे बळकट राहतात

6. संतुलन राखणारे व्यायाम

पडण्याचा धोका कमी

उदाहरण: एका पायावर उभे राहणे (सपोर्ट घेऊन)

व्यायामाची सुरुवात हळूहळू करावी. अतिश्रम टाळावे. व्यायामासाठी आरामदायक कपडे व शूज वापरावेत आणि महत्वाचे

पुरेसे पाणी प्यावे. योग्य आहार घ्यावा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.