Marathi Language Row: शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला आपला विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय निरुपम (Sanjay Nirupam) हे दहिसरमधील रिक्षा चालकांसोबत संवाद साधण्यासाठी आले होते. त्याचवेळी, मनसैनिकांनी (MNS) दहीसरमध्ये धाव घेत संजय निरुपम यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीची घोषणा देत संजय निरुपम यांच्या कारची हवा सोडली, त्यांच्या गाडीवर बाटली फेकून मारल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. या प्रकरणी मनसेच्या 11 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले असून या 11 हि कार्यकर्त्यांना बोरिवली न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर प्रत्येकाला 6000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सोडण्यात आलं आहे. तर दुसरीकडे, याच प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे दहिसर विधानसभा विभाग प्रमुख राम यादव यांच्या विरोधात एम. एच.बी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
MNS Dahisar Rada : टॅक्सी-रिक्षा चालकांसोबत कार्यक्रमाचे आयोजन करणं भोवलं, राम यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल
शिवसेना शिंदे गटाचे नेते राम यादव यांच्याकडून दहिसर पश्चिम गणपत पाटील नगर परिसरात संजय निरुपम यांच्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. या रिक्षा टॅक्सी चालकांचा संवाद कार्यक्रमाला मनसेकडून विरोध होता. या प्रकरणी शिवसेना नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून मराठी सक्ती संदर्भ फेरविचार करण्यासाठी विनंती केली होती. तर संजय निरुपम यांच्याकडून मराठी सक्तीला विरोध होता आणि मराठी सक्तीमुळे ज्या रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये भीतीचे वातावरण होतं, अशा लोकांना एकत्र करून त्यांच्यासोबत संवाद कार्यक्रम घेण्यात येणार होते.
सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे अधिक तपास सुरु
संजय निरुपम यांच्या या भूमिकेमुळे मनसे आक्रमक होत दहिसरमध्ये संजय निरुपम यांच्या संवाद कार्यक्रमा विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यासोबत दगडफेक आणि हल्ला सुद्धा करण्यात आल्याचे दिसून आलं. याप्रकरणी एम.एच.बी पोलिसांनी मनसेचा 11 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. मात्र, मनसेच्या सुद्धा संजय निरुपम आणि राम यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी एम.एच.बी पोलिसांकडे मागणी करण्यात आली होती. त्यांनतर याप्रकरणी एम.एच.बी पोलिसांनी रिक्षा टॅक्सी चालक सावंद कार्यक्रमाचे आयोजन करणारे राम यादव विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या राम यादव यांच्या विरोधात एम.एच. बी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओ आधारे अधिक तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या