वेधक – पारधी मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश
Marathi April 26, 2026 11:25 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> प्रज्ञा जाधव

शिपाई अनंत झेंडे यांच्या कार्याची यशस्वी गोष्ट. महामानव बाबा आमटे यांच्या विचाराची शिदोरी घेऊन समाजसेवेच्या विश्वात रममाण झालेले श्रीगोंदा येथील अनंत झेंडे हे 150 पारधी मुलांचा सांभाळ करीत आहेत. यात 68 मुली आहे. त्यांनी या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे राहणे, जेवण ही सर्व जबाबदारी पार पाडली आहे. महामानव बाबा आमटे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी या पारधी मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश आणत मुलांना नवी दिशा व स्वप्ने देण्याचा प्रयत्न केला आहे.

अनंत झेंडे यांचे मुळगाव अहिल्यानगर- दौंड रस्त्यावरील चिखली येथील आहेत. सामाजिक कामाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाल्यामुळे लहानपणापासून समाजसेवेची आवड त्यांच्यात निर्माण झाली. त्यांनी बारावीपर्यंतच शिक्षण घेत 2005 मध्ये ज्ञानदीप शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून काम सुरू केले. त्यापूर्वी 2002 मध्ये भारतसेवक डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्याकडे त्यांनी श्रमसंस्काराचे धडे घेतले. आनंदवनमध्ये उन्हाळी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.