काठमांडू: हिंदुकुश हिमालय (एचकेएच) क्षेत्रात सलग चौथ्या वर्षी बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी नोंदविण्यात आले असून, २०२६ मध्ये या तुटीने गेल्या वर्षीचा नीचांकी विक्रमही मोडला आहे. ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट’ने (इसिमोड) प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. मात्र, या संकटकाळात गंगा खोऱ्यातील बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा १६.३ टक्क्यांनी अधिक राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..‘इसिमोड’च्या वार्षिक अहवालानुसार, २००३ ते २०२६ या काळात हिंदुकुश हिमालय क्षेत्रात १४ वेळा हिवाळ्यात बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले आहे. यंदा बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा २७.८ टक्क्यांनी घटले असून, गेल्या वर्षीची २३.६ टक्क्यांची तूटही मागे पडली आहे.
जगातील या सर्वोच्च पर्वतरांगेतील बर्फाच्या साठ्यात होणारी ही घट म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक यंत्रणेचे कोसळणे असल्याचे अहवालात म्हटले आहे. याचा थेट परिणाम या भागातील १२ प्रमुख नद्यांवर अवलंबून असलेल्या सुमारे दोन अब्ज लोकांच्या पाणी सुरक्षेवर होणार आहे.
अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
दहा प्रमुख नद्यांच्या खोऱ्यात बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी
मेकाँग, तारिम आणि तिबेटच्या पठारावर गेल्या
२४ वर्षांतील नीचांकी पातळी
गंगा (१६.३ टक्के अधिक) आणि इरावती
Pune Education News: उन्हाळी सुट्टीतच शिक्षकांना प्रशिक्षण बंधनकारक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा निर्णय; ४ मेपासून हाेणार सुरुवात!(२१.८ टक्के अधिक) या दोनच खोऱ्यांत बर्फाचे प्रमाण समाधानकारक
सिंधू नदीच्या खोऱ्यात १८.१ टक्के तूट; यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाणीटंचाईचे संकट गडद होणार
ब्रह्मपुत्रा खोऱ्यातही यंदा ६.१ टक्के तूट नोंदवण्यात आली आहे.
याउलट, मेकाँगमध्ये उणे ५९.५ टक्के, तिबेटी पठारावर उणे ४७.४ टक्के आणि साल्विनमध्ये उणे ४१.८ टक्के अशी तीव्र तूट कायम आहे.