False marriage promise abuse : शाहूवाडी तालुक्यातील वसीम मणेर या तरुणाने एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून व ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनदेखील २०२१ पासून अत्याचार केल्याची फिर्याद शाहूवाडी पोलिस ठाण्यात पीडित मुलीने दिली. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, त्याच्यावर ॲट्राॅसिटीसह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पीडितानेआज पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार वसीम मणेर याने फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनदेखील वारंवार आत्याचार केला. तो स्वतः विवाहित असून त्याला मुले आहेत.
Kolhapur crime news : दारू पिऊन बापावर उलटणाऱ्या मुलाचा बापानेच काढला काटा, कोल्हापुरातील विक्रमनगरात धक्कादायक प्रकारफिर्यादी पीडितेने मणेर याला लग्नाचा रेटा लावल्यावर त्याने अगोदरच्या लग्नाचा घटस्फोट करून मग आपण लग्न करू, असे सांगितले. मात्र, तो लग्न करत नसल्याने आज फिर्यादीने आपल्याला फसवून अत्याचार केला असल्याची फिर्याद दिली. मागील पाच ते सहा वर्षे संशयितपीडित तरुणीवर अत्याचार करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.