आयपीएल 2026 स्पर्धेत रविवारी 26 एप्रिलला डबल हेडरमधील दुसऱ्या आणि एकूण 38 व्या सामन्यात आतापर्यंतचे 2 अपयशी संघ आमनेसामने असणार आहेत. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा एकूण आठवा सामना असणार आहे. लखनौने आतापर्यंत 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर केकेआरची लखनौपेक्षा वाईट अवस्था आहे. केकेआरला 7 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. केकेआरचा 1 सामना पावसाने वाया घालवला. तर केकेआरला 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. दोन्ही संघांचं इथून प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. दोन्ही संघांचं आव्हान कायम आहे. मात्र त्यासाठी उर्वरित सामने हे मोठ्या फरकाने जिंकावे लागतील जे इतकं सोपं नाही.
केकेआरने एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मात्र यंदा अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात केकेआरला काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे केकेआर अर्धा हंगाम संपल्यानंतर कमबॅक करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कॅप्टन्सीत लखनौने 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता लखनौला आपलं आव्हान कायम राखायचं असेल तर सातत्यपूर्ण कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही.
दोन्ही संघ कितव्या स्थानीकोलकाता पॉइंट्स टेबलमध्ये 3 गुणांसह सर्वात शेवटी अर्थात दहाव्या स्थानी आहे. लखनौ सुपर जायंट्स नवव्या स्थानी आहे.
लखनौ-कोलकातापैकी सरस कोण?लखनौ सुपर जायंट्सचा कोलकाता विरुद्ध दबदबा असल्याचं आकडे सांगतात. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. लखनौने या 7 पैकी 5 सामन्यांमध्ये केकेआरला पराभवाचं पाणी पाजलं आहे. तर कोलकाताने लखनौ विरुद्ध 2 सामन्यांत विजय मिळवला आहे. आता उभयसंघातील आठव्या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सामन्याबाबत महत्वाची माहितीदरम्यान लखनौ विरुद्ध कोलकाता सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता दोन्ही कर्णधारांमध्ये टॉस जिंकून बॅटिंग/बॉलिंग कोण करणार हे निश्चित होईल. हा सामना लखनौमधील श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीवर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहता येणार आहे.