CSK vs GT Live Streaming : गुजरातसमोर चेन्नई विरुद्ध पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान, यला आर्मी जिंकणार?
Tv9 Marathi April 26, 2026 09:45 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात रविवारी 26 एप्रिलला डबल हेडर अर्थात 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या 19 व्या मोसमातील आठवा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चौथा सामना जिंकण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. यलो आर्मीच्या घरच्या मैदानात हा सामना होणार असल्याने त्यांना चाहत्यांचं पाठिंबा असणार आहे. अशात गुजरातचा कस लागणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

चेन्नईची कामगिरी आणि आकडे

चेन्नई आणि गुजरात दोन्ही संघांना आतापर्यंत आपल्या कामगिरीत सातत्य ठेवता आलेलं नाही. चेन्नई आणि गुजरात दोन्ही संघांनी 7 पैकी 4 सामने गमावले आहेत. चेन्नईला या मोसमात आपल्या मोहिमेतील पहिल्या 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर चेन्नईने जोरदार कमबॅक करत सलग सलग 2 सामने जिंकले. मात्र चेन्नई विजयी हॅट्रिक करण्यात अपयशी ठरली. मात्र चेन्नईने त्यानंतर आपल्या सातव्या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई विरुद्ध मिळवला. चेन्नईने मुंबईवर 103 धावांनी मात केली. त्यामुळे चेन्नईला नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला. ताज्या आकडेवारीनुसार, चेन्नई सध्या 6 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर चेन्नईचा नेट रनरेट हा +0.118 असा आहे.

गुजरातने आतापर्यंत काय केलं?

गुजरातने आपल्या मोहिमेतील पहिले 2 सामने गमावले. त्यानंतर सलग 3 सामने जिंकले. त्यानंतर पुन्हा 2 सामने गमावले. गुजरात 6 गुणांसह आणि -0.790 अशा नेट रनरेटसह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे.

सामन्याबाबत महत्त्वाची माहिती

चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता नाणेफेक होईल. सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर मोबाईवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायाल मिळेल.

हेड टु हेड रेकॉर्ड

दरम्यान चेन्नई विरुद्ध गुजरात यांची आमनेसामने येण्याची ही नववी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघात एकूण 8 वेळा आमनासामना झाल आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. चेन्नई आणि आणि गुजरातने प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. आता दोघांपैकी कोणता संघ विजयी पंच लगावतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.