Lungi Ngidi Updates: डोक्याला मार लागल्याने अँब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलेल्या एनगिडीची कशी आहे प्रकृती? दिल्लीने दिले अपडेट्स
esakal April 26, 2026 09:45 AM

Lungi Ngidi Injury Updates: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी (२५ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात अरुण जेटली स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात एक दुर्घटना घडली होती. दिल्लीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी दुखापतग्रस्त झाला होता. त्याला अँब्युलन्समधून हॉस्पिटमलमध्ये नेण्यात आले होते. आता त्याच्या दुखापतीबद्दल आता दिल्ली कॅपिटल्सने अपडेट्स दिले आहेत.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

या सामन्यात दिल्लीने पंजाबसमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तिसऱ्या षटकात प्रियांश आर्यने अक्षर पटेलविरुद्ध मोठा शॉट खेळला, पण चेंडू उंच उडाला. यावेळी झेल घेण्याच्या प्रयत्नात लुंगी एनगिडी त्याच्या डोक्यावर पडला. त्यावेळी काही क्षण तो तसाच झोपून होता. त्यावेळी मेडिकल टीमच्या त्याच्यावर प्रथोमचार केले. तो डॉक्टरांशी बोलत होता, पण त्याची प्रकृती फारशी ठीक दिसत नव्हती. त्याची परिस्थिती पाहाता मैदानात अँब्युलन्स बोलवण्यात आली आणि त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.

त्यामुळे लुंगी एनगिडीच्या प्रकृतीबाबत क्रिकेट विश्वातून चिंता व्यक्त होत होती. अखेर दिल्ली कॅपिटल्सने त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली की लुंगी एनगिडीची प्रकृती स्थिर आहे. त्याला लवकरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल.

लुंगी एनगिडी दिल्लीच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आयपीएल २०२६ स्पर्धेत ७ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, त्याची आता प्रकृती स्थिर असली, तरी आता तो पुनरागमन कधी करणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याला आता या दुखापतीतून जर पूर्ण तंदुरुस्त होण्यास वेळ लागणार असेल, तर तो आयपीएल २०२६ मधून बाहेर होऊ शकतो.

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलच्या नाबाद १५२ धावा आणि नितीश राणाच्या ९१ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात २ बाद २६४ धावा केल्या. मात्र, नंतर पंजाब किंग्सने प्रभसिमरन सिंगच्या ७६ धााव आणि श्रेयस अय्यर नाबाद ७१ धावांच्या खेळीमुळे १८.५ षटकात २६५ धावा करत विजय मिळवला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.