Donald Trump: थोडक्यात बचावले ट्रम्प, मेजवाणी कार्यक्रमात गोळीबाराचा थरार, हल्लेखोर कोण? Iran शी कनेक्शन?
GH News April 26, 2026 11:10 AM

Cole Thomas Allen Shooter: अमेरिकेत मोठी धक्कादायक घटना घडली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या वॉशिंग्टनमधील पत्रकारांसाठी आयोजित मेजवाणीच्या कार्यक्रमात गोळीबार करण्यात आला. जगभरातील माध्यमांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. त्यावेळी हल्लेखोर या मेजवाणी कार्यक्रमात जबरदस्ती घुसण्याच्या प्रयत्नात होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला हटकताच, त्याने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. सतर्क असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच रोखले आणि त्याचा एन्काऊंटर केला. कोण होता हल्लेखोर? इराणशी त्याचे काय कनेक्शन?

राष्ट्राध्यक्ष सहीसलामत बाहेर

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या मेजवाणी कार्यक्रमातून सहीसलामत बाहेर काढण्यात आले. या मेजवाणी कार्यक्रमस्थळी गोळीबार झाला. त्यावेळी ट्रम्प हे आत होते. शुक्रवारी गोळीबाराची घटना घडली. अशा घटना आमच्यासाठी नवीन नाही असे सुरक्षा रक्षकांनी फॉक्स न्यूजला सांगितले. या ठिकाणी उपस्थितांना कडक सुरक्षा प्रणालीतूनच आत सोडण्यात आले. हल्लेखोर आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याचा संशय उपस्थित गुप्तहेरांना आला. त्यांनी सुरक्षा यंत्रणांकडून त्याचा तपासणीचा प्रयत्न केला.

कोल थॉमस एलन याने लागलीच झाडली गोळी

कोल थॉमस एलन असे हल्लेखोराचे नाव आहे. तो 30-31 वर्षांचा होता. तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या मेजवाणीत शिरण्याचा त्याचा प्रयत्न होता. सिक्रेट एजन्टच्या सतर्कतेमुळे तो रडारवर आला. त्याला पकडण्याचा प्रयत्न होत असतानाच त्याने बॉलरुममध्ये एका सिक्रेट एजन्टवर गोळी झाडली. गोळीबार सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. त्याने सात ते आठ राऊंड फायर केल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षा रक्षकांनी कव्हरअप करत त्याला घटनास्थळावरून दूर नेण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात कोल थॉमस एलन ठार झाला.

कॅलिफोर्नियाचा रहिवासी कोल थॉमस एलन याची माहिती आता तपास यंत्रणा घेत आहेत. त्याचे इराणशी काही संबंध आहेत का? याचाही तपास करण्यात येत आहे. त्याने गोळीबार का केला याविषयीची माहिती घेण्यात येत आहे. त्याचे गुन्हेगारांशी काही संबंध आहेत का याचा तपास करण्यात येत आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, गोळीबार करणारा मारला गेला आहे. त्यांनी कार्यक्रम चालू ठेवण्याचा आग्रह केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.