Thane News : ठाण्यातील नागला बंदर, भाईंदर पाडा येथील खासगी बांधकाम व्यावसायिक यांनी ठेवलेल्या बाउन्सर आणि स्थानिक लोकांमध्ये वाद झाला आहे. जमिनीच्या वादावरुन दोघेही आमने सामने भिडल्याचं पाहायला मिळालं. 24 गुंठे जागा होती त्यामधून एका खाजगी डेव्हलपरला 12 गुंठे जागा देण्यात आली. उरलेल्या 12 गुंठे जमिनीवर आमची असून एका खाजगी बांधकाम व्यवसायिकांनी अचानक रित्या पुन्हा अतिक्रमण करायला सुरुवात केली. यामध्ये व्यवसायिक बिल्डरचे बाऊन्सर आणि स्थानिक गावकरी आमने-सामने भिडल्याचं पाहायला मिळालं.
स्थानिक गुंडांनी तलवारी ,चोपर घेऊन दगडफेक, शिवीगाळ करण्यात आली. यामध्ये अंदाजे स्थानिक 3 जण जखमी झाले आहेत .त्यांच्यावर सिव्हील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. स्थानिक आमदार त्यांच्या गावगुंड आणि बाउन्सरने हल्ला केला असा थेट आरोप करत आहेत. या आधी देखील आश्वासन दिलं होतं की तुमच्या जागेवर कुठलाही अतिक्रमण होऊ देणार नाही. आमची सरकारकडे एकच मागणी आहे की स्थानिक गावकऱ्यांनी जगावं की नाही. हेच त्यांनी सांगावं. स्थानिक आमदार जबाबदारी घेणार का ? (परिवहनमंत्री प्रताप सरनाईक) नेत्यांना पोलीस प्रोटेक्शन. आम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात प्रोटेक्शन साठी मागणी केली होती. जमिनीचा वादाबाबत कासारवडवली पोलीस धिक तपास करत आहेत.
मीरा भाईंदर विधानसभाचे भाजप पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता उद्या सकाळी 11 वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, मिरा भाईंदर येथे सर्वांनी एकत्र जमावे व तेथून कासारवडवली पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांच्या सोशल मीडिया पेजवर करण्यात आले आहे.
आता शांत बसायचं नाही, हक्कासाठी एकजूट दाखवायचीच. कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
लातूर शहरातील जुना रेणापूर नाका परिसरात दोन जणांना बेदम मारहाण झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लातूर शहरातील जुना रेणापूर नाका परिसरात दोन व्यक्तींना एका टोळक्याकडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही जणांच्या तरुणांनी या दोघांना रस्त्यावरच अडवून लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लातूर शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.