Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग
esakal April 27, 2026 02:45 AM

कायगाव: हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमळनेर वस्ती (ता. गंगापूर) येथील शादवल बाबा यांचा उरूस मंगळवारी ( ता. २८) एप्रिल रोजी सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

गोदावरी नदीच्या काठी अमळनेर वस्ती शिवारात शादवल बाबा यांची प्राचीन दर्गा आहे. वर्षभर दर गुरुवारी दूरदूरहून भाविक येथे येऊन बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतात.

उरूसच्या पूर्वसंध्येला सोमवारी (ता.२७) एप्रिल रोजी सायंकाळी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामेश्वर मुंदडा यांच्या शेतवस्ती पासून शादवल बाबांच्या दर्ग्यापर्यंत संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवारी मुख्य उरूस साजरा होईल.

उरूस निमित्त दर्ग्यावर चुना मारून, विद्युत रोषणाई करून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला आहे. या उरुसात पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उर्स कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.