IPL 2026 Playoff Scenario: Is Kolkata Knight Riders Out of the Race? : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्स व लखनौ सुपर जायंट्स यांना पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाता नाइट रायडर्सकडून झालेल्या पराभवामुळे LSG शेवटच्या क्रमांकावर गेले आणि त्यांचे आव्हान जवळपास संपल्यात जमा झाले आहे. आयपीएल २०२६ च्या ३८ सामन्यानंतर आतापर्यंत सहा संघांनी प्रत्येकी ८, तर चार संघांनी प्रत्येकी ७ सामने खेळले आहेत. त्यामुळे कोणता संघ प्ले ऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहे आणि कोणता मागे? हे जाणून घेऊयात...
मुंबई इंडियन्स, कोलकाता एका बाकावर...शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सने रविवारी CSK ला पराभूत करून IPL 2026 Point Table मध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. GT ने ८ सामन्यांत ४ विजय मिळवून ८ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. KKRने रात्री लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून आठव्या क्रमांकावर आगेकूच केली. त्यांचे ८ सामन्यांत ५ गुण झाले आहेत आणि उर्वरित सहा सामन्यांत त्यांना सर्व सहा किंवा किमान पाच सामने जिंकावेच लागणार आहेत. पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचीही अवस्था तिच आहे आणि ते ७ सामन्यांत ४ गुण मिळवून नवव्या क्रमांकावर आहेत. उर्वरित ७ सामने जिंकल्यास ते १८ गुणांपर्यंत पोहोचू शकतात.
IPL 2026 Controvarsy: फुल राडा... अंगकृश रघुवंशीच्या विकेटने वातावरण पेटले! अम्पायरने त्याला ढकलले, अभिषेक नायर भांडला Video लखनौ सुपर जायंट्सचा प्रवास खडतर...दहाव्या क्रमांकावर असलेल्या LSG ला ६ पैकी सहा सामने जिंकूनही १६ गुणांपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे त्यांना इतरांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स यांनीही प्रत्येकी ३ सामने जिंकले आहेत, परंतु CSK ८ सामने खेळले आहेत. त्यामुळे चेन्नईला उर्वरित सहा सामन्यांत विजय मिळवून १८ गुणांपर्यंत पोहोचता येईल. पण, हे सहज शक्य होईल असे वाटत नाही. दिल्लीला ७ पैकी ७ सामने जिंकून २० गुणांपर्यंत जाता येईल. पण, हेही जरतर चे गणित आहे.
अव्वल चार संघ फायद्यात...आयपीएल २०२६ गुणतालिका पाहिल्यास पंजाब किंग्स ७ सामन्यांत ६ विजय व एका अनिर्णित निकालामुळे १३ गुणांसह अव्वल स्थानावर मजबूत पकड घेऊन बसला आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ७ सामन्यांत ५ विजय मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स हेही प्रत्येकी १० गुणांसह टॉप फोअर मध्ये आहेत, परंतु त्यांनी RCB पेक्षा एक सामना जास्त खेळला आहे.
Who is Sanjay Singh? लुंगी एनगिडी कोसळला, Ambulance आली; पुढे ९ किमीच्या अंतरात काय घडले? २८ सेकंदाचा थरारक Videoआयपीएल प्लेऑफसाठी २० ही गुणसंख्या सर्वात सुरक्षित मानली जात आहे. त्यामुळे PBKS ने सातपैकी ४ सामने जिंकून अव्वल स्थानासह आपली जागा पक्की करू शकतात. तेच RCB, SRH, RR यांनाही प्रत्येकी ५ विजय २० गुणांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. पंजाबने २० गुणांसह अव्वल स्थान पक्के केल्यास १८ व १६ गुणही प्ले ऑफसाठी निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे आता अव्वल चारमध्ये नसलेले संघही गुणतालिकेत उलटफेर घडवून आणू शकतात.