Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Marathi Update: लखनौ सुपर जायंट्सने गमावलेला सामना खेचून आणला... १५५ धावांचा पाठलाग करताना लखनौला शेवटच्या षटकांत १७ धावा हव्या होत्या.. कोलकाता नाइट रायडर्सचा विजय निश्चित मानला जात होता. पण, कार्तिक त्यागीने दोन फुलटॉस नो बॉल फेकले आणि सामन्याला कलाटणी मिळाली. तरीही २ चेंडूंत ७ धावा हव्या असताना कार्तिकने निर्धाव चेंडू फेकला, परंतु मोहम्मद शमीने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून सामना बरोबरीत आणला. त्यामुळे सामना Super Over मध्ये गेला आणि त्यात सुनील नरीनने ३ चेंडूंत सामन्याचा निकाल लावून टाकला. नेमकं काय घडलं, शेवटपर्यंत वाचा....
मोहसिन खानच्या ( ४-१-२३-५ ) तिखट माऱ्यासमोर कोलकाताच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. KKR ची अवस्था ६ बाद ७३ अशी केली. रिंकूने ५१ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ८३ धावांची नाबाद खेळी करून संघाला ७ बाद १५५ धावांपर्यंत पोहोचवले. रिंकूने आठव्या विकेटसाठी सुनील नरीनला ( ४) सोबत घेऊन ३० चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तरात आलेल्या LSGला वैभव अरोराने दुसऱ्या षटकात झटका दिला. मिचेल मार्श २ धावांवर झेलबाद झाला. ( शेवटच्या षटकात नेमके काय घडले? वाचा)
IPL 2026 Controvarsy: फुल राडा... अंगकृश रघुवंशीच्या विकेटने वातावरण पेटले! अम्पायरने त्याला ढकलले, अभिषेक नायर भांडला Videoएडन मार्करम ( ३१) व कर्णधार रिषभ पंत ( ४२) यांनी LSG चा डाव सावरताना ५७ धावांची भागीदारी केली.KKR च्या गोलंदाजांनीही टिच्चून मारा करताना लखनौच्या धावगतीला लगाम लावला होता. आयुष बदोनी ( २४) व हिंमत सिंग ( १९) यांनी लखनौला शर्यतीत ठेवले होते. हिंमत सिंगने ६ चेंडू १७ धावा असा सामना जवळ आणलेला. कार्तिक त्यागिने 1b,1nb,3nb,4,W,1b,0 असा खेचून आणला होता. पण, मोहम्मद शमीने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून लखनौला ८ बाद १५५ अशी बरोबरी मिळवून दिली.
कोलकाता नाइट रायडर्सने सुपर ओव्हरमध्ये त्यांचा अनुभवी गोलंदाज सुनील नरीनकडे चेंडू दिला. त्यात लखनौ सुपर जायंट्सने फॉर्मात नसलेल्या निकोलस पूरनला पाठवून मोठा डाव खेळला. नरीनने पहिल्याच चेंडूवर पूरनचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या चेंडूवर एडन मार्करमचा अफलातून झेल घेतला गेला अन् लखनौचा डाव १ धावांवर संपुष्टात आला. सुपर ओव्हरमध्ये दोन विकेट्स पडल्या की डाव संपतो. आयपीएलमध्ये सुपर ओव्हरमधील पहिल्या डावातील ही निचांक धावसंख्या ठऱली. रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
IPL Point Tableकोलकाता नाइट रायडर्सने आजचा सामना जिंकून गुणतालिकेत ५ गुणांसह आठव्या क्रमांकावर कूच केली आहे. ८ सामन्यांतील हा त्यांचा दुसरा विजय होता आणि पंजाब किंग्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना एक गुण मिळाला होता. लखनौ सुपर जायंट्स मात्र आता दहाव्या क्रमांकावर गेले आहेत आणि ८ सामन्यांत त्यांच्या खात्यात फक्त ४ गुण झाले आहेत. त्यांनी उर्वरित ६ सामने जिंकल्यास ते १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतात, तरीही त्यांचे प्ले ऑफचे स्थान पक्के नाहीच होत आहे. कारण मग त्यांना इतरांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.