Latest Marathi News Live Update : छायाचित्रकार आणि छायापत्रकार रघु राय यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली
esakal April 27, 2026 01:46 PM
Raghu Rai: छायाचित्रकार आणि छायापत्रकार रघु राय यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छायाचित्रकार आणि छायापत्रकार रघु राय यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाला मुकलो आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं

Mumbai Live: मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईतील मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात

दोन दुचाकींचा अपघात

तिघांटा जागीच मृत्यू

Ratnagiri Whale Dead Body : आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर आढळला व्हेलचा मृतदेह

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या रत्नागिरीतील प्रसिद्ध आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी (ता. २६) एका महाकाय व्हेल माशाचा मृतदेह वाहून आला आहे. हा मासा पाण्यात असल्यामुळे त्याला बाहेर काढणे अशक्य असल्याचे कंडाळावन अधिकाऱ्यांनी सांगितले.

CPR Hospital Renovation : सीपीआर नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रवेशव्दारांचे काम लवकरच पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या महिनाभरात सीपीआर रुग्णालय अलिशान व अत्याधुनिक उपचार सेवा देणाऱ्या रुग्णालयाचे काम पूर्ण होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे सूतोवाच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतेच केले आहे.

MLA Sanjay Gaikwad : आमदार गायकवाडांच्या घरावर उद्या मोर्चा; भाकप कार्यकर्ते आज होणार बुलढाण्याला रवाना

कोल्हापूर : बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मंगळवारी (ता. २८) मोर्चा काढण्याची जय्यत तयारी केली असून सोमवारी (ता. २७) प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यासह कार्यकर्ते मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून सायंकाळी बुलढाण्याला रवाना होणार आहेत. दरम्यान, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंबी यांना भेटून त्यांना आज पाठिंबा व्यक्त केला.

Fertilizer Dealers Strike : खत विक्रेत्यांचा आजपासून 'बंद'; राज्यातील कृषी सेवा केंद्राचे विक्रेते होणार सहभागी

नाशिक : रासायनिक खतांचे मार्जिन व लिंकिंग, खतांची विक्री करताना थेट गुन्हा दाखल करणे आणि ‘साथी’ ॲपच्या माध्यमातून बियाणे विक्री अनिवार्य केल्याचा निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइडस, सीड्स डिलर्स असोसिएशन (माफदा) यांनी राज्यात सोमवार (ता.२७) पासून बेमुदत ‘बंद’ची हाक दिली आहे. ‘माफदा’च्या या ‘बंद’ला नाशिक ॲग्रो डिलर्स असोसिएशन (नाडा) या संघटनेने पाठिंबा दिल्यामुळे राज्यभरातील ४५ हजार कृषी निविष्ठा विक्रेत्यांची दुकाने बंद राहतील, असा दावा या संघटनांनी केला आहे.

Ashok Kharat Case : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात अटक

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरात यास विशेष तपास पथकाने (एसआयटी) काल दुपारी महिला अत्याचाराच्या सातव्या गुन्ह्यात अटक केली आहे. सोमवारी (ता. २७) त्यास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येऊन, एसआयटीकडून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

Dhirendra Krishna Shastri of Bageshwar Dham : 'कोणाची मने दुखावली असेल तर माफी मागतो'; छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर धीरेंद्र शास्त्रींनी मागितली माफी

Latest Marathi Live Updates 25 April 2026 : ‘‘कथेत गुरू आणि शिष्यातील नातेसंबंध अधोरेखित करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले होते. गुरुमहिमाप्रती छत्रपती शिवाजी महाराज किती समर्पित होते हा भाव दर्शविण्यासाठी उदाहरण दिले होते. या शब्दांना काहींनी वेगळ्या पद्धतीत मांडल्याने विपर्यास झाला. कोणाची मने दुखावली असेल तर माफी मागतो,’’ अशा शब्दांत बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिले. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.