Gold Price Today : मुंबई-दिल्लीत दर खाली, लगेच तपासा तुमच्या शहराचा भाव, 10 ग्रॅम सोनं आज..
Tv9 Marathi April 27, 2026 01:46 PM

भारतीय परंपरेज सोनं-चांदीला मोठं महत्व आहे, सोन्यातील गुंतवणूक ही फायद्याची आणि सुरक्षित मानली जाते. सोन्या-चांदीचे दागिने करण्यात, ते घालण्यात अनेकांना रस असतो, त्यामुळे भारतात सोन्या-चांदीचे ग्राहक, ते विकत घेण्यात रस असलेल्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रोजच्या रोज सोन्याचे दर किती, ते वाढले की कमी झाले, हेही ग्राहक तपासून पहात असतात.

सध्या दोन्ही मौल्यवान धातुच्या किंमतीतील चढउतार हा खूप चर्चेचा विषय आहे. नव्या आठवड्याचा हा पहिला दिवस असून देशात सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घट झाल्याचे दिसून आले आहे. 27 एप्रिलच्या सकाळी राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर खाली कोसळले असून 10 ग्रॅम किंवा 1 तोळा सोन्याची किंमत ही 1 लाख 54 हजार 810 रुपये इतकी आहे. तर मुंबईत सोन्याचे भाव हे 1 लाख 54 हजार 30 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. गेल्या एका आठवड्याभरात 24 कॅरेट सोनं हे 1740 रुपयांनी स्वस्त झालं आहे. दरम्यान, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचे दर प्रति औंस 4,694.26डडॉरल्स ​​पर्यंत घसरले.

डॉलरचं झालेलं बळकटीकरण, तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षासंदर्भातील सततची अनिश्चितता, ही सोन्याच्या किमतीतील घसरणीची मुख्य कारणं आहेत. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे वाढती महागाई आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या उच्च व्याजदरांविषयी चिंता वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे 107 डॉलरच्या आसपास आहेत.

देशातील महत्वाच्या शहरातील दर

राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोनं 1,54,180 रुपये प्रति 10 ग्रॅमने मिळतंय तर 22 कॅरेट सोन्यासाटी 1,41,340 रुपये भाव आहे. तर मुंबई आणि कलकत्ता येथे 24 कॅरेट सोनं हे 1,54,030 रुपये आणि 22 कॅरेट सोनं हे 1,41,190 रुपये इतकं आहे.

चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,54,900 रुपये आणि 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 1,41,990 रुपये इतके आहेत.

पुण्यात आणि बंगळुरूतील सोन्याचे दरही समोर आले असून या दोनेही शहरांत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,54,030 रुपये आणि 22 कॅरेट सोनं हे 1,41,190 रुपये दराने मिळत आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹) 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹)
दिल्ली 141340 154180
मुंबई 141190 154030
अहमदाबाद 141240 154080
चेन्नई 141990 154900
कोलकाता 141190 154030
हैदराबाद 141190 154030
जयपुर 141340 154180
भोपाळ 141240 154080
लखनऊ 141340 154180
चंदीगड 141340 154180

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आणि अमेरिकेसोबतच्या युद्धाच्या कायमस्वरूपी समाप्तीसाठी इराणच्या मागण्यांची यादी सादर केल्यानंतर शनिवारी इस्लामाबाद सोडले, ज्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीच्या भवितव्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. यापूर्वी, अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर शनिवारी पाकिस्तानला भेट देणार असल्याचे वृत्त समोर आलं होतं. मात्र, इराण आणि अमेरिका यांच्यात कोणतीही बैठक नियोजित नाही असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं. इराणची भूमिका पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कळवण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं.

इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची हे पाकिस्तानातून निघून गेल्यावर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की, स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर आता इराणसोबतच्या चर्चेसाठी इस्लामाबादला जाणार नाहीत. “इराणी लोकांना भेटण्यासाठी माझ्या शिष्टमंडळाचा इस्लामाबादचा दौरा मी रद्द केला आहे,” असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट केले.

चांदीची किंमत

सोन्याप्रमाणेच आज चांदीची चमकही फिकी दिसली. त्यातही सासत्याने घसरण सुरू आहे. 27 एप्रिलच्या सकाळी, चांदीचा भाव प्रति किलोग्राम 2,59,900 रुपयांपर्यंत घसरला. गेल्या आठवड्यात चांदीच्या भावात 15 हजार रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट चांदीचे भाव प्रति औंस 75.48 डॉलर्सपर्यंत घसरले. देशांतर्गत सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.