What Axar Patel said after Delhi Capitals loss Against RCB? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी मागील तीन दिवस विचित्रच होते म्हणावे लागेल... शनिवारी पंजाब किंग्सविरुद्ध २६४ धावांचा डोंगर उभा करणारा दिल्लीचा हाच संघ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ७५ धावांवर ऑल आऊट झाला. बरं, २६४ धावा करूनही हा संघ जिंकला नाहीच, त्यामुळे आज त्यांच्याकडून केवळ ७५ धावांचा यशस्वी बचावाची अपेक्षा करणेच फोल होते. तीन दिवसांत बरंच काही घडल्यानंतर कर्णधार अक्षर पटेलही ( Axar Patel) कन्फ्युज झाला. RCB कडून लाजीरवाणा पराभव पत्करल्यानंतर त्याने दिलेली प्रतिक्रिया मजेशीर होती...
भुवनेश्वर कुमार व जोश हेझलवूड यांनी ज्या प्रकारे DCला पहिल्या सहा षटकांत उचलून बॅकफूटवर फेकले, ते पाहता RCB चा ४९ ऑल आऊट हा विक्रम मोडला जातोय, असेच दिसत होते. पण, अभिषेक पोरेल ( ३०), डेव्हिड मिलर ( १९) व कायले जेमिन्सन ( १२) यांनी संघाची लाज वाचवली. दिल्लीने १६.३ षटकांत ७५ धावांपर्यंत मजल मारली. १२ धावांत ४ विकेट्स घेणारा हेझलवूड मॅन ऑफ दी मॅच ठरला. भुवीने ५ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला७५ धावा म्हणजे, RCB समोर काहीच नव्हत्या आणि त्यांनी ६.३ षटकांत एक विकेटच्या बदल्यात हे लक्ष्य पार केले. जेकब बेथेल ११ चेंडूंत २० धावांवर माघारी परतल्यानंतर देवदत्त पडिक्कलने १३ चेंडूंत ३४ धावा कुटल्या. विराट कोहलीने १५ चेंडूंत २३ धावा करताना आयपीएल इतिहासात ९००० धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला.
RCB विरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल कमालीचा निराश दिसला, मात्र त्याने पराभवाचे खापर कोणा एकावर न फोडता क्रिकेटमधील अनिश्चिततेवर भाष्य केले. अक्षर म्हणाला की, "मला अजूनही नेमकं काय झालं हे समजत नाहीये. म्हणूनच असं म्हणतात की क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणी सतर्क राहावं लागतं. तुम्ही एक दिवसही हा खेळ हलक्यात घेऊ शकत नाही."
IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ! फॉर्मात असलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार, फ्रँचायझीने त्याच्या जागी कुणाला घेतले पाहा...GT विरुद्धच्या सामन्यात सुटलेले झेल किंवा धावबाद करण्याच्या हुकलेल्या संधी यावर भाष्य करताना तो म्हणाला की,"खेळाडू म्हणून अशा गोष्टी घडतच राहतात. पण त्यावर विचार करत बसण्यापेक्षा आपण काय चांगलं करत आलो आहोत, त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. नकारात्मक किंवा सकारात्मक विचार करून काहीही फायदा नाही, शेवटी तुम्हाला मैदानात उतरून खेळावंच लागतं. आजचा दिवस आमचा नव्हता, पण आम्हाला पुढच्या सामन्याचा विचार करायचा आहे."
भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी केलेल्या सुरुवातीच्या आक्रमणाबद्दल तो म्हणाला की, ते जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. जर आमच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी १-२ ओव्हर्स खेळून काढल्या असत्या, तर चित्रात बदल झाला असता.