Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला
esakal April 28, 2026 02:45 AM

Virat Kohli Creates History in RCB vs DC Match: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. भुवनेश्वर कुमार व जोश हेझलवूडच्या माऱ्यासमोर दिल्लीने ७५ धावांवर शरणागती पत्करली आणि बंगळुरूने ६.३ षटकांत १ विकेट गमावून हे लक्ष्य सहज पार केले. आयपीएल इतिहासातील हा सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेला दुसरा मोठा विजय ठरला. RCB ने आज ९ विकेट्स व ८१ चेंडू राखून ही मॅच जिंकली .

Biggest Won in IPL (by balls remaining)
  • ८७ - MI विरुद्ध KKR (२००८)

  • 81 - RCB विरुद्ध DC (२०२६)*

  • ७६ - KTK विरुद्ध RR (२०११)

  • ७३ - PBKS विरुद्ध DC (२०१७)

  • ७२ - SRH विरुद्ध RCB (२०२२)

  • ७१ - RCB विरुद्ध PBKS (२०१८)

  • ७० - MI v RR (२०२१)

IPL 2026 : आता, खरी मजा येणार! CSK ने ११० चेंडूंत २१५ धावा चोपणाऱ्या मुंबईच्या खेळाडूला बोलावलं; कोण आहे Ayush Vartak?

जोश हेझलवूड ( ४-१२) व भुवनेश्वर ( ३-५) यांनी पॉवर प्लेमध्येच दिल्लीला १३ धावांत ६ धक्के दिले होते. अभिषेक पोरेल ( ३०) खेळला म्हणून दिल्लीला ७५ धावांपर्यंत पोहोचता आले. रसिख सलाम, सुयश शर्मा व कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी १ बळी टिपला. RCB ने ६.३ षटकांत १ बाद ७७ धावा करून विजय मिळवला. जेकब बेथेल ११ चेंडूंत २० धावांवर कायले जेमिन्सनला विकेट देऊन माघारी परतला. देवदत्त पडिक्कलने १३ चेंडूंत ३४ धावांची वादळी खेळी केली. तर विराटने १५ चेंडूंत २३ धावांची नाबाद खेळी केली.

विराट कोहलीचा भीमपराक्रम...

विराटने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात २३ धावा करून एक मोठा भीमपराक्रम नावावर केला. आयपीएलमध्ये ९००० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. विराटने २७५ सामन्यांत ४०.०५च्या सरासीरेन ९०१२ धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर ८ शतकं व ६८ अर्धशतकं आहेत. त्यानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज...

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ! फॉर्मात असलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार, फ्रँचायझीने त्याच्या जागी कुणाला घेतले पाहा...
  • ७१८३ - रोहित शर्मा

  • ६७६९ - शिखर धवन

  • ६५६५- डेव्हिड वॉर्नर

  • ५५८० - लोकेश राहुल

  • ५५२८ - सुरेश रैना

  • ५४३९ - महेंद्रसिंग धोनी

  • ५१९४ - अजिंक्य रहाणे

  • ५१६२ - एबी डिव्हिलियर्स

  • ५००८ - संजू सॅमसन

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.