भारताने जगाला दाखवली थेट ताकद, एकाही देशाला जे जमले नाही ते भारताने केले, थेट खार्ग बेटाहून..
GH News April 28, 2026 03:11 PM

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद ठेवण्यात आली. इराणने आता होर्मुज खाडी खुली करण्याकरिता एक प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावात त्यांनी अमेरिकेला नाकेबंदी उठवण्यास सांगितले. मात्र, दोन्ही देश एकमेकांना प्रस्ताव देण्याचे काम करत आहेत. प्रत्यक्षात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असूनही भारतात कच्चे तेल दाखल होत आहे. त्याचे कारण म्हणजे रशिया भारताला गुप्त मार्गाने तेल पुरवठा करत आहे. जग तेलाच्या टंचाईचा सामना करत आहे, याला भारत अपवाद आहे. शिवाय रशियाने या युद्धाच्या काळातही स्पष्ट केले की, भारताला हवे तेवढे तेल आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. जगभरातील तेलवाहू जहाज होर्मुज खाडीत अडकले आहेत. एक जहाज तिथून निघत नाहीये. मात्र, असे असतानाही रशियातून तेलवाहू जहाज भारतात पोहोचत आहेत.

अमेरिकेने ओमान खाडीतून निघणाऱ्या जहाजांवर कडक लक्ष ठेवले. मोठी नाकेबंदी केली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बारापेक्षा अधिक तेलवाहू टँकर जहाज त्या भागातून निसटण्यात यशस्वी झाले आहेत. इराणच्या खार्ग बेटावरून जहाजांना थेट मुंबईला पोहोचता येईल, असा एक मार्गही समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. देश गरिमा जहाज मुंबईत पोहोचले.

इराणकडून त्याच्यावर गोळीबारही करण्यात आला होता. त्यानंतर ते सुरक्षित मुंबईत पोहोचले. भारतीय जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री करण्यात भारतीय नौदल महत्त्वाची भूमिका बजावते. यासोबतच या काळात भारताला रशियाचीही मोठी साथ मिळालीये. रशिया या वाईट काळातही भारताच्या मदतीला धावून आल्याचे बघायला मिळत आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात रशियाने दूर राहण्याची भूमिका घेतली. मात्र, अमेरिकेकडून रशियावर आरोप केले जात आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री रशियाच्या दाैऱ्यावर गेले. यावेळी रशियाने स्पष्ट केले की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. रशियाने थेट जाहीरपणेच इराणला समर्थन दिले. आम्ही इराणच्या हितासाठी त्यांच्या प्रत्येक निर्णयात सहभागी असल्याचे पुतिन यांनी म्हटले. रशिया आणि इराणची मैत्री यादरम्यान जगाने बघितली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.