तूच ट्रॉफी आहेस, म्हणणाऱ्याला प्रिती झिंटाने सुनावलं; IPL मध्ये पंजाबचा सामना संपल्यानंतर काय घडलं?
admin April 28, 2026 04:26 PM
[ad_1]

अभिनेत्री प्रिती झिंटाची ‘पंजाब किंग्स’ टीम यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आहे. अशातच प्रिती तिच्या बिनधास्त स्वभावामुळेही चर्चेत आली आहेत. तूच ट्रॉफी आहेस, असं म्हणणाऱ्या युजरला तिने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर रोखठोक उत्तर दिलं आहे. पंजाब किंग्सच्या दमदार परफॉर्मन्सचा जल्लोष करताना प्रितीने युजरच्या टिप्पणीवर उत्तर दिलं आहे. महिलांसाठी असे शब्द वापरणं योग्य नसल्याचं तिने म्हटलंय. तिचं हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत. एक्स अकाऊंटवरील प्रश्नोत्तरांदरम्यान एका युजरने प्रिती झिंटालाच ‘ट्रॉफी’ असं म्हटलं होतं. ‘तिने आतापर्यंत ट्रॉफी न जिंकण्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे ती स्वत:च एक ट्रॉफी आहे’, असं संबंधित युजरने लिहिलं. यावर नाराज व्यक्त करत प्रितीने तिच्याच अंदाजात उत्तर दिलं.

काय म्हणाली प्रिती झिंटा?

‘धन्यवाद, ही फारच प्रेमळ गोष्ट आहे, परंतु खरं सांगायचं तर कोणत्याच महिलेला ट्रॉफी बनायची इच्छा नसते. ट्रॉफी मिळवले जातात आणि महिला कोणचीच संपत्ती नसतात. ट्रॉफींना शोकेसमध्ये ठेवलं जातं आणि एका महिलेची जागा तुमच्या आयुष्यात आणि हृदयात असते. फिल्मी प्रश्नासाठी मी फिल्मी उत्तर दिलं आहे’, असं तिने म्हटलंय. आणखी एका ट्विटमध्ये तिने पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरचंही कौतुक केलं. ‘तो अत्यंत समजुतदार आणि प्रेरणादायी लीडर आहे. जो स्वत: एक उदाहरण सादर करून टीमला प्रोत्साहन देतोय. माझी मुलं त्याला श्रेयस भैय्या म्हणून हाक मारतात’, असं प्रिती झिंटाने मजेशीरपणे लिहिलं.

श्रेयस अय्यरच्या मार्गदर्शनाखाली पंजाब किंग्स आयपीएल 2026 मध्ये दमदार परफॉर्म करत आहे. ही टीम सात सामन्यांमध्ये 13 अंकांसह गुणतालिकेवर अग्रस्थानी आहे. नुकतंच पंजाबने दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात 265 धावांचा रेकॉर्ड लक्ष्य साध्य केला होता. त्यावेळी अय्यरने फक्त 36 चेंडूंमध्ये 76 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्सला कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य कोच रिकी पाँटिंगचं मार्गदर्शन लाभत आहे. पंजाब किंग्स ही आयपीएलच्या इतिहासात पहिल्या सात सामन्यांमध्ये 12 पेक्षा जास्त गुण मिळवणारी पहिली टीम ठरली आहे. टीकेवर अभ्यास करून आपल्या कामगिरीला योग्य दिशा दिल्यास ती एक मोठी ताकद बनू शकते, हे श्रेयसने सिद्ध केलं आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.