मराठी सक्तीचे मीटर डाऊन? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची काय भूमिका? टॅक्सी, रिक्षा चालक बिनधास्त!
Tv9 Marathi April 28, 2026 05:45 PM

Marathi Compulsory for Auto-Taxi Drivers: मराठी सक्ताची पोपट कोणी मारला? यावरून आता राजकारण तापलं आहे. 1 मे, महाराष्ट्र दिनापासून मुंबईतील टॅक्सी, ऑटो रिक्षा चालकांना मराठी सक्तीचा करण्याचा निर्णयावरून सरकारने एकाएक माघार घेतली आहे. सरकार या भूमिकेवरुन घुमजाव करणार हे निश्चित मानले जात होते. शिंदे सेनेतही या सक्तीवरून विरोध सुरू होता. मराठी सक्ती करायचीच होती तर मग अगोदरच सरकारने तशी सहा महिन्यांची मुदत का दिली नाही असा आरोप विरोधक करत आहेत. मराठी सक्तीचा धोरण लांबल्याने दुसरीकडे लाखो हिंदी भाषिक ऑटो आणि टॅक्सी चालकांचा जीव भांड्यात पडला आहे.

1 मे पासून नाही होणार परमिट रद्द

मुंबईत ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे सक्तीचे करण्याविषयीची मुदतवाढ देण्यात आली आहे. कालावधी वाढीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या आजच्या बैठकीत वाहन परमिटचा कालावधी वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. 1 मे पासून परमिट रद्द होणार नाहीत. सूत्रांनुसार, 1 मे पासून परमिट रद्द न करण्यावर बैठकीत उपस्थित सर्वांचे एकमत झाले आहे. त्यामुळे हजारो ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संप होणार नाही

शरद राव यांनी जाहीर केलेली आहे की, टॅक्सी, ऑटो चालकांचा संप होणार नाही. त्यांनी आम्हाला तसं कळवलं आहे. हिंदी भाषिक ऑटोचालक, टॅक्सी चालक जर मराठी भाषा शिकू इच्छित असतील तर त्यांना आपल्याला संधी द्यावी लागेल. तर ओला, उबर, रॅपिडो यांच्या चालकांनाही मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्याची तरतूद आहे. त्यांनाही याविषयीच्या सूचना करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.