BJP Gujarat victory : गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. सुरूवातीचे कल आता हाती येऊ लागले आहेत. राज्यात सर्वच ठिकाणी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षात तिरंगी लढत आहे. मागील काही वर्षांपासून बहुतेक महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका व पंचायत समित्यांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे यावेळीही भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
गुजरातमधील १५ महापालिका, ८४ नगरपालिका, ३४ जिल्हा परिषदा आणि २६० पंचायत समित्यांसाठी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, बहुतेक ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. दुपारी एक वाजेपर्यंतच्या निकालानुसार एकूण ९ हजार ९९२ जागांपैकी ३ हजार ५९४ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी भाजपला तब्बल २ हजार ९५१ जागांवर विजय मिळाला आहे.
काँग्रेसच्या खात्यात केवळ ४७४ तर आपसह अन्य पक्ष व अपक्षांना १६९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. मात्र, या निकालाने सर्वच विरोधी पक्षांचा भ्रमनिरास झाला आहे.
IPS Controversy : खेळ तुम्ही सुरू केला, शेवट आम्ही करणार..! एन्काऊंटर स्पेशालिस्ट IPS अधिकाऱ्याला नेत्याकडून धमकीगुजरातमधील सर्व महापालिकांमध्ये भाजप सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. एकूण १ हजार ४४ जागांपैकी आतापर्यंत भाजपचे ५०७ उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसला केवळ ३२ जागांवर समाधान मानावे लागले असून इतरांना पाच जागा मिळाल्या आहेत. नगरपालिकांमध्येही हीच स्थिती असून २ हजार ६२४ जागांपैकी आतापर्यंत भाजपला १ हजार १३१ जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस केवळ २०२ जागा मिळवू शकली.
जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही भाजपचाच दबदबा दिसून येत आले. आतापर्यंत १ हजार ९० जागांपैकी ३०९ जागांचे निकाल हाती आले असून त्यापैकी २६० जागांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. काँग्रेसला ३० तर इतरांना १९ जागा मिळाल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. एकूण ५ हजार २३४ जागांपैकी १ हजार ३२० जागांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. त्यापैकी भाजपला १००७ जागांवर विजय मिळाला आहे.
Raghav Chadha news : राघव चड्ढा यांच्याच विधेयकामुळे फिरला असता सगळा राजकीय डाव; खासदारकीसह भाजपमध्ये प्रवेश करणे झाले असते अशक्य...आतापर्यंत भाजपने शहरी भागासह ग्रामीण क्षेत्रातही विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेस आणि आपने या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावला होता. पण दोन्ही पक्ष आपला प्रभाव पाडू दाखवू शकले नाहीत. काही भागात एआयएमआयएम आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळाला आहे.