Raja Shivaji Sairat Actor Role: सध्या मनोरंजनविश्वात बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट 'राजा शिवाजी ' ची (Raja Shivaji) प्रचंड चर्चा आहे. 100 कोटींचं बजेट असणारा हा मराठी सिनेमा 1 मे 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शौर्यावर आधारित या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री जेनेलिया सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटात मराठी आणि हिंदी कलासृष्टीतील अनेक तगड्या कलाकारांची फौज आहे . महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी,अमोल गुप्ते या मराठी कलाकारांसह अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, सलमान खान अशी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आणखी एका मराठी लोकप्रिय अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. या सगळ्या दमदार कलाकारांसोबत सैराट चित्रपटातील एक दिग्गज मराठी अभिनेता चित्रपटात झळकणार आहे. या अभिनेत्याने केलेल्या एका पोस्टची सध्या चर्चा रंगलीय. (Sairat Fame Actor in Raja Shivaji )
अनेक मराठी सिनेमांमध्ये खलनायकी भूमिका साकारणारे अभिनेते सुरेश विश्वकर्मा हे राजा शिवाजी या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी सैराट चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. आता 'राजा शिवाजी ' या बिग बजेट चित्रपटात ते दिसणार आहेत. या संदर्भातील त्यांनी केलेल्या एका पोस्टने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. रितेश देशमुखसोबत फोटो पोस्ट करत त्यांनी त्यांच्या भूमिकेविषयी सांगितलं आहे.
त्यांनी लिहिलं ' एक मे पासून भारतभर प्रदर्शित होणाऱ्या राजा शिवाजी या भव्यपटात चंद्रराव मोरे यांच्या भूमिकेत...!! रितेश विलासराव देशमुख या अतिशय संस्कार आणि विनम्र अभिनेता दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव ..!! 'अशी पोस्ट अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी केलीय.चंद्रराव मोरे ही महत्त्वाची भूमिका आहे. स्वराज्यातली एक महत्त्वाचं स्थान असणाऱ्या जावळीच्या खोऱ्याचा संघर्ष राजा शिवाजी चित्रपटात दिसणार आहे.
View this post on Instagram
सुरेश विश्वकर्मा हे अलीकडेच 'गोंधळ' सिनेमात दिसले. 'मुळशी पॅटर्न' या गाजलेला चित्रपटातही त्यांची भूमिका ही लक्षात राहणारी होती. महाराष्ट्राच्या लोकनाट्य प्रकारातील अनेक चित्रपट नाटकांमध्ये मावशी ते सोंगाड्यापर्यंत सर्व भूमिका त्यांनी साकारल्यात. अनेक स्टेज शो, मालिका, चित्रपट वेब सिरीज मध्ये त्यांच्या भूमिकांचे कौतुक झालं. सैराट चित्रपटातील आर्चीच्या वडिलांच्या भूमिकेने त्यांना घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. सुरेश विश्वकर्मा यांनी सैराट चित्रपटाशिवाय रेगे, महिमा खंडोबाचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटांमध्येही काम केले आहे.