Karan Aujla Bisexual Tweet: 'Boyfriend' गाण्यातून प्रकाशझोतात आलेला करण औजला (Karan Aujla) सध्या एका व्हायरल ट्विटमुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियात (Social Media) व्हायरल होत आहे. त्यानं आपल्या पोस्टमधून एक धक्कादायक खुलासा केला असल्याचं म्हटलं जात आहे. व्हायरल पोस्टमध्ये करणने स्वत:ला Bisexual असल्याचं म्हटलं आहे. त्यानं एक्सवर ट्विट करुन याबद्दल जाहीर केलं, असं म्हटलं जात आहे. सध्या त्याच्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, ट्विट व्हायरल होताच इंटरनेटवर खळबळ उडाली. त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला. परंतु, या पोस्टवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. ही पोस्ट फेक असल्याचं काहींचं म्हणणं आहे.
करण औजलाशी संबंधित असलेल्या एका व्हेरिफाईड एक्स हँडलवरुन शेअर केलेली ही पोस्ट जानेवारी 2026 ची आहे. त्या पोस्टमध्ये, 'इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप वेळ लागला. पण अखेर मनमोकळेपणाने बोलताना आता मला आरामदायी वाटत आहे. मी बायसेक्शुअल आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे. प्रेम पसरवत राहा. प्रत्येकाला प्रेम पाठत राहा', असं पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. या पोस्टचं स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
तेव्हापासून सोशल मीडियात खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणात आता, करण औजलाच्या टीमकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, करण औजलाच्या टीमचं असं म्हणणं आहे की, ही पोस्ट फेक आहे. या पोस्टशी सिंगरचा संबंध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, करण औजलाचं एक्सवर अधिकृत अकाऊंट नाही. एक्सवर त्याच्या नावाचे बरेच अकाऊंट आहेत. सिंगरचं केवळ इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर अधिकृत अकाऊंट आहेत.
विशेष म्हणजे, ज्या @karanaujla_music हँडलवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे, हे अकाऊंट एक्सवर अस्तित्वात नाही. त्यामुळे सिंगर करणने ही पोस्ट शेअर केली नाही, हे स्पष्ट होते. करण औजलाने आपल्या कारकिर्दीत अनेक अल्बम आणि बॉलिवूडमधील चित्रपटांसाठी गाणं गायलं आहे. 'बॅड न्यूज' चित्रपटातील करण औजलाचं 'हुस्न तेरा तौबा तौबा' हे गाणं प्रचंड गाजलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या: