क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
जयदीप मेढे April 28, 2026 05:43 PM

Gujarat Local Body Election Results 2026: गुजरातमध्ये 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल आज (28 एप्रिल) जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची बहीण नयनाबा जडेजा (Nayanaba Jadeja) यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजकोट महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या नयनाबा यांचा भाजपने (BJP) पराभव केला आहे.

Gujarat Local Body Election Results 2026: जडेजा कुटुंबातील राजकीय संघर्ष चर्चेत

रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा या भाजपच्या आमदार आहेत, तर त्यांची बहीण नयनाबा या काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. या निवडणुकीत नयनाबा यांनी राजकोटमधून नशीब आजमावले होते, मात्र मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवल्याने नयनाबा यांना पराभवाचा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये काँग्रेसने नयनाबा यांच्या लोकप्रियतेवर मोठा भर दिला होता. प्रचारादरम्यान त्यांनी भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका केली होती; मात्र मतदारांनी भाजपच्या उमेदवारांनाच पसंती दिली. राजकोट हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला असून, यंदाही शहरात भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे. नयनाबा यांचा पराभव हा या विभागात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Nayanaba Jadeja: पराभवानंतर नयनाबा काय म्हणाल्या?

पराभवानंतर नयनाबा जडेजा म्हणाल्या, “जनतेचा कौल मला मान्य आहे. जय-पराजय हा निवडणुकीचा अविभाज्य भाग असतो. मात्र, मी पक्षासाठी आणि जनतेसाठी माझे काम सुरूच ठेवणार आहे. समाजसेवेच्या कार्यातही मी सक्रिय असून ते कार्य पुढेही सुरू राहील. या काळात मला खूप काही शिकायला मिळाले,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

Who is Nayanaba Jadeja: कोण आहेत नयनाबा जडेजा?

नयनाबा जडेजा या क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची बहीण असून, त्या गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून सक्रिय आहेत. राजकोट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्या प्रथमच उतरल्या होत्या. नगरसेवकपदासाठी त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Vidhan Parishad Election 2026 Shivsena: शिंदे गट उद्धव ठाकरेंची वाट अडवणार, विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात दहावा उमेदवार उतरवणार, शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Auto Taxi Marathi Pratap Sarnaik: मराठी समजत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा अधिकारच नाही; प्रताप सरनाईकांनी पुन्हा ठणकावलं, मीरा-भाईंदरच्या 562 रिक्षाचालकांविरोधात नोटीस

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.