पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून मोठ्या चर्चा सुरू असतानाच आता, सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात देखील अशीच एक (Pune Crime News) धक्कादायक घटना घडली आहे. टुरिस्ट व्हीजावर भारतात आलेले तीन अमेरिकन नागरिक ख्रिश्चन धर्माचा प्रचार (Pune Crime News) करताना आढळून आल्यानंतर त्यांना १० मे च्या आत देश सोडून देण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.(Pune Crime News)
३ अमेरिकन नागरिक टुरीस्ट व्हीजा मिळवून काही दिवसांपूर्वी भारतात आले होते. पिंपरी चिंचवड मधील एका हॉटेलमध्ये त्यांनी २६ एप्रिलला मुक्काम केला. २७ तारखेला ते पुण्यातील शुक्रवार पेठेत आले. त्यावेळी त्यांच्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापण्यात आलेली पत्रके होती. शुक्रवार पेठेतील एका ड्रायव्हरला त्यांनी त्यातील एक पत्रक देऊन ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा कसा चांगला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्या ड्रायव्हरने तिथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर त्या तीन अमेरिकन नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना विशेष शाखेत नेण्यात आले. तिथे त्यांच्याकडे चौकशी केली असता ते धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले. टुरिस्ट व्हीजावर भारतात आलेल्या परदेशी नागरिकांना धर्मप्रसार करण्यासाठी कायद्याने मनाई आहे. तरीही ते तिन अमेरिकन नागरिक धर्मप्रसार करत असल्याचे समोर आलं आहे. याआधी देखील हे तीन अमेरिकन नागरिक कधी टुरिस्ट तर कधी बीझनेस व्हीजावर भारतात आल्याचं त्यांच्या पासपोर्ट वरुन दिसून आलं आहे.
पर्यटक (Tourist) व्हिसावर भारतात येऊन ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तीन अमेरिकन नागरिकांना 'लीव्ह इंडिया' (भारत सोडा) नोटीस बजावली आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या तिघांनाही १० मे २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीसांच्या माहितीनुसार, ५३, ६५ आणि ६६ वर्षे वयोगटातील हे तीन अमेरिकन नागरिक १९ ते २१ एप्रिल दरम्यान पर्यटक व्हिसावर भारतात आले होते. २६ एप्रिलपासून ते पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये मुक्कासाला होते आणि पुणे परिसरात फिरत होते. २७ एप्रिल रोजी सकाळी, पुण्याच्या शुक्रवार पेठ भागात या तिघांनी एका खाजगी कॅब ड्रायव्हरला बायबल आणि ख्रिश्चन धर्माशी संबंधित इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील पत्रके दिली. "ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे," असे सांगून त्यांनी त्या चालकाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
त्या कॅब चालकाने परिसरातून जाणाऱ्या एका रॅलीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्या बॅगांची झडती घेतली असता, मोठ्या प्रमाणात विविध भाषांतील धार्मिक पत्रके आढळून आली. पुणे शहर पोलिसांच्या परदेशी नोंदणी कार्यालयाने (FRO) केलेल्या चौकशीत असे निष्पन्न झाले की, हे नागरिक पर्यटक व्हिसावर आले असताना धार्मिक प्रचार आणि शिकवणुकीचे काम करत होते, जे कायद्याने बेकायदेशीर आहे.
परदेशी नोंदणी कार्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले की, "इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्टमधील तरतुदींनुसार, व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या तिघांना 'लीव्ह इंडिया नोटीस' देण्यात आली आहे." यापूर्वी जुलै २०२५ मध्येही पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका ४१ वर्षीय अमेरिकन नागरिकाला अटक केली होती. तो व्यक्ती आर्थिक मदतीचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात समोर आले होते. तो २०१६ पासून टुरिस्ट आणि बिझनेस व्हिसावर येत होता, मात्र कोणताही व्यवसाय न करता केवळ धार्मिक प्रचार करत असल्याचे आढळले होते.