Sanskrutik Kaladarpan Awards 2026: ABP माझा (ABP Majha News Channel) वृत्तवाहिनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आलाय. कलादर्पण पुरस्कारांवर (Sanskrutik Kaladarpan Awards) एबीपी माझाची छाप उमटली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026 सोहळ्यात वाहिनीला पत्रकारिता विभागांमध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ABP माझानं सर्वोत्तम वाहिनीचा पुरस्कार पटकावलाय, तर माझा कट्ट्याला सर्वोत्तम लक्षवेधी कथाबाह्य पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. तसेच, एबीपी माझाचे प्रतिनिधी वेदांत नेब (Vedant Neb) यांना सर्वोत्कृष्ट पुरुष वार्ताहार म्हणून सन्मानित करण्यात आलंय.
सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026 सोहळा प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिर येथे पार पडला. यंदाचं हे सांस्कृतिक कलादर्पण पुरस्काराचं 28 वं वर्ष आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ABP माझा वृत्तवाहिनीला सुद्धा पत्रकारिता विभागांमध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले. एबीपी माझा वृत्तवाहिनीला 'सर्वोत्कृष्ट मराठी वृत्तवाहिनीचा पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. तर 'लक्षवेधी कथाबाह्य कार्यक्रम' म्हणून 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला सुद्धा सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यासोबतच एबीपी माझाचे प्रतिनिधी वेदांत नेब यांना सर्वोत्कृष्ट पुरुष वार्ताहार पुरस्कारानं गौरवण्यात आलं
सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार (Sanskruti Kaladarpan Awards) हा मराठी चित्रपट, नाटक, मालिका आणि पत्रकारिता क्षेत्रातील एक अत्यंत मानाचा पुरस्कार आहे. 2001 पासून सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा गौरव केला जातो. यंदा 28 एप्रिल 2026 रोजी हा दिमाखदार सोहळा पार पडला. यंदा ABP माझा वृत्तवाहिनीनं पत्रकारितेच्या विविध विभागांमध्ये पुरस्कार प्राप्त झालेत.