विंग: खेळता-खेळता पाण्याच्या टाकीत पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी उघडकीस आली. टाकेवस्ती-चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील वेदांत आबासाहेब साठे (वय १३) असे मुलाचे नाव असून, तो विंगच्या आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी होता. या घटनेने गाव व परिसरातील ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.
Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..घटनास्थळ व चचेगाव पोलिस पाटील प्रशांत पवार यांनी दिलेली माहिती अशी, की वेदांत सकाळी नऊच्या सुमारास खेळायला जातो, म्हणून घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नाही. खूप उशीर झाल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर त्याचा शोध सुरू केला. कुटुंबीय व काही तरुणांनी परिसर अक्षरशः पिंजून काढला.
प्राथमिक अंदाज व्यक्त करत टाकेवस्ती येथील सटवाई मंदिरालगतच्या शिवकालीन टाकीत त्यानंतर शोधमोहीम राबवली. वीज पंपाने पाणीउपसा केला. त्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या वेळी कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता.
घटनेची माहिती कऱ्हाड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी उशिरा चचेगाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Pune Education News: उन्हाळी सुट्टीतच शिक्षकांना प्रशिक्षण बंधनकारक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा निर्णय; ४ मेपासून हाेणार सुरुवात!वेदांत विंगच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. तो एकुलता एक होता. त्याच्या घरची परिस्थिती बेताची असून, वडील रिक्षा चालवतात. आई जिल्हा परिषदेच्या चचेगाव शाळेत आहार शिजवण्याचे काम पाहते. घरी चुलत चुलत्याचा १३ व्याचा विधीचा कार्यक्रम होता होता. सर्वजण विधीच्या कामात व्यस्त होते.