Maharashtra News Live Update : मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
Sarkarnama April 29, 2026 11:45 AM
अखेर गोकुळ दूध संघावर प्रशासकच येणार

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह गोकुळ दूध संघातील सत्ताधाऱ्यांकडून संघावर प्रशासक येऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रात्री उशिरा झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघावर नव्या कायद्यातील तरतुदीनुसार सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपताच प्रशासक येणारच असे स्पष्ट केले. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या सत्ताधाऱ्यांसह नेत्यांना धक्का बसला आहे.

विधानपरिषदेसाठी भाजपकडून ५ नावांची घोषणा

भाजपने जाहीर केलेल्या यादीत सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार या नावांचा समावेश आहे. तर प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

Massajog Election Results : मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचं गाव असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख हे सरपंच पदाचे उमेदवार होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.