गगनचुंबी इमारतीत किंचाळ्या घुमल्या, पॉश गौर ग्रीन अव्हेन्यू सोसायटीत बघता बघता भयंकर आग; अनेक मजले धडाधड पेटले
Tv9 Marathi April 29, 2026 03:45 PM

दिल्लीलगतच्या गाझियाबाद येथील इंदिरपुरम भागातील अत्यंत आलिशान असलेल्या ग्रीन सोसायटीमध्ये आगीची घटना घडली. काही वेळातच आगीने राैद्ररूप धारण केले. सोसायटीतील एका फ्लॅटला बुधवारी पहाटेच आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग इतकी जास्त भीषण आहे की, सर्वत्र फक्त आणि फक्त धुरच दिसत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग सोसायटी इमारतीच्या 9व्या, 10व्या आणि 11व्या मजल्यांसह अजून वरच्या तीन मजल्यांना लागली. कोणाला काही कळण्याच्या आतच भीषण आग लागली. आगीची घटना कळताच सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. लोक आपल्या फ्लॅटमधून बाहेर येत सुरक्षितस्थळी पळाले. सोसायटीमध्ये एकच गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले.

सीएम योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना देत बचावकार्य राबवण्याच्या सूचना दिल्या. हेच नाही तर त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारचा चुकीचा प्रकार सहन केला जाणार नाही. सीएम योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ गाझियाबाद पोलिस अधिक्षक आणि जिल्ह्याधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, उपस्थित लोकांनी सांगितले की, सकाळी आठच्या दरम्यान आग दिसली.

लोकांचे म्हणणे आहे की, काही लोक प्लॅटमध्ये अडकली आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांचे म्हणणे आहे की, फ्लॅटमध्ये काही लोक अडकल्याची कोणीतीही माहिती मिळत नाहीये. प्रशासनाने यादरम्यान सांगितले की, आग विझल्यानंतर फ्लॅटची तापसणी केली जाईल. सध्याच्या परिस्थितीनुसार तरीही फ्लॅटमध्ये कोणी अडकल्याची माहिती मिळत नाहीये. घटनास्थळी अग्नीशामक दलाच्या 20 गाड्या उपस्थित आहेत. आग विझवण्याचे काम केले जात आहे. आग विझवण्यात काही समस्या येत आहेत.

सोसायटीच्या कंम्पाऊटमुळे प्रेशरने फ्लॅटपर्यंत पाणी पोहोचत नाहीये. ज्यामुळे आग विझवण्यासाठी अधिकच वेळ लागत आहे. प्रशासनाला या आगीच्या घटनेबद्दल 8.30 वाजता माहिती मिळाली. ज्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या प्रशासनाकडून बचावकार्य राबवले जात आहे. सोसायटीपासून लोकांना दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. घटनास्थळी पोलिसही पोहोचले आहेत. या आगीच्या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.