Solapur Manohar Bhosale Crime : सोलापूर जिल्ह्यातील भोंदू बाबा मनोहर भोसले (Manohar Bhosle) याच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून आता करमाळा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणूक आणि जादूटोण्याचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आता मनोहर भोसले याचा पाय आणखी खोलात रुतत चालला आहे. करमाळा तालुक्यातील घोटी येथील आश्रमात मनोहर भोसले याच्याकडे पुण्यातील एक जण व्यावसायिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आला होता. यावेळी त्याला सुरुवातीला भेटण्यासाठी 5 हजार रुपये घेण्यात आले. संबंधित व्यक्तीची अडचण ऐकण्यासाठी 50 हजार रुपये घेतले. त्याची अडचण ऐकून घेतल्यानंतर त्याला यातून मार्ग काढून त्यात बरकत मिळवून देण्यासाठी आपल्याकडे उपाय आहे, असे त्याला सांगण्यात आले आणि त्यासाठी एक लाख 51 हजार खर्च येणार असल्याचे सांगितले.
Manohar Mama Bhosale News : एक लाख 76 हजार रुपये देऊन ही काही फरक पडला नाही
दरम्यान, त्या व्यक्तीने आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगितले. शेवटी एक लाख एकवीस हजार रुपयेमध्ये उपाय करण्याचे ठरले. या व्यक्तीस उपाय म्हणून एक धागा बांधून त्याला एक अंगाऱ्याची पुडी पाण्यातून घेण्यास दिली. मात्र अनेक दिवस झाले तरी पीडित व्यक्तीची असलेली अडचण काही दूर झाली नाही. एक लाख 76 हजार रुपये देऊन ही काही फरक पडला नाही. परिणामी, आपली सदर भोंदू बाबाकडून मोठ्या स्वरूपात आर्थिक फसवणून झाल्याचे लक्षात येताच या व्यावसायिकाने करमाळा पोलिसात धाव घेतली. करमाळा पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन भोंदू बाबा मनोहर भोसले आणि त्याचा एक सहकारी विरोधात जादूटोणा आणि अर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Manohar Bhosale Crime : भोसलेच्या विरोधात दुसरा आर्थिक फसवणूक आणि जादूटोण्याचा गुन्हा दाखल
दरम्यान, यापूर्वी दाखल असलेल्या पन्नास हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील गुन्ह्यात काल माढा न्यायालयाने मनोहर भोसले आणि त्याचे दोन सहकारी यांना दोन मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पहिल्या गुन्ह्यातच अडचणीत असलेल्या भोसलेच्या विरोधात आता दुसरा आर्थिक फसवणूक आणि जादूटोण्याचा गुन्हा दाखल झाल्याने त्याचा अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
Who Is Manohar Mama Bhosale : कोण आहे मनोहर मामा भोसले?
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी.
डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता.
एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला.
करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वतःचा मठ थाटला होता.
साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली.
अनेक मोठ्या नेत्यासोबत देखील मनोहर मामा याचे फोटो आहेत.
अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे.
या आधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे.
कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती.
ही बातमी वाचा: