MI vs SRH : हेड-क्लासेनचा झंझावात, हैदराबादचा विजयी पंच, मुंबईचा 6 विकेट्सने धुव्वा
Tv9 Marathi April 30, 2026 06:45 AM

ट्रॅव्हिस हेड आणि हेन्रिक क्लासेन या जोडीने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. मुंबईने रायन रिकेल्टन याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हैदराबादने हे आव्हान 8 बॉलआधी आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केंल. हैदराबादने 18.4 ओव्हरमध्ये 249 धावा केल्या. हैदराबादने अशाप्रकारे आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सलग पाचवा आणि एकूण सहावा विजय ठरला आहे. तर मुंबई इंडियन्सचा हा एकूण सहावा तर वानखेडे स्टेडियममधील चौथा पराभव ठरला. मुंबईच्या पराभवामुळे रायन रिकेल्टनची शतकी खेळी वाया गेली.

मुंबईचा बॅटिंगचा निर्णय

मुंबई टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. रायन रिकेल्टन याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 243 धावा केल्या. रायन रिकेल्टन व्यतिरिक्त विल जॅक्स, नमन धीर आणि कॅप्टन हार्दिक पंड्या या तिघांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

रायन रिकेल्टन याने 55 बॉलमध्ये नॉट आऊ 123 रन्स केल्या.रायनने या दरम्यान 8 सिक्स आणि 10 फोर ठोकले. रायन यासह मुंबईसाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तसेच विल जॅक्स याने 46 रन्स केल्या. कॅप्टन हार्दिक पंड्या याने 31 धावांचं योगदान दिलं. तर नमन धीर याने 22 धावा केल्या. हैदराबादसाठी प्रफुल हिंगे याने 2 विकेट्स मिळवल्या. तर साकीब हुसैन, एशान मलिंगा आणि नितीश कुमार रेड्डी या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

हैदराबादचा विजयी पंच

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने हैदराबादला अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. हेड आणि अभिषेकेने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत 52 बॉलमध्ये 129 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. त्यानंतर मुंबईने जोरदार कमबॅक केलं. मुंबईने 9 बॉलमध्ये हैदराबादला 3 झटके दिले. अल्लाह गजनफर याने हैदराबादला डावातील नवव्या ओव्हरमध्ये सलग 2 झटके दिले. अल्लाहने अभिषेक शर्मा आणि इशान किशन या दोघांना सलग 2 चेंडूवर बाद केलं. अभिषेकने 45 धावा केल्या. तर इशानला भोपळाही फोडता आला नाही.

त्यानंतर हार्दिक पंड्या याने 10 व्या ओव्हरमध्ये ट्रॅव्हीस हेड याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.हेडने 30 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 4 चौकार ठोकले. हेड आऊट झाल्याने हैदराबादचा स्कोअर 9.4 ओव्हरमध्ये 3 आऊट 133 असा झाला. त्यानंतर हेन्रिक क्लासेन आणि नितीश रेड्डी या दोघांनी 40 बॉलमध्ये 80 रन्सची पार्टनरशीप करुन हैदराबादच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. नितीश आऊट झाल्याने ही जोडी फुटली.
नितीशने 17 बॉलमध्ये 3 फोरसह 21 रन्स केल्या.

स्कोअरकार्ड


त्यानंतर क्लासेन आणि सलील अरोरा या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 14 बॉलमध्ये नॉट आऊट 36 रन्सची पार्टनरशीप केली. अशाप्रकारे हैदराबादने सलग पाचवा विजय मिळवला. क्लासेनने 30 बॉलमध्ये नॉट आऊट 65 रन्स केल्या. क्लासेनने या दरम्यान 4 षटकार आणि 7 चौकार लगावले. तर सलील अरोरा याने 10 चेंडूत नाबाद 30 धावांचं योगदान दिलं. हैदराबादने अशाप्रकारे विजय मिळवला. मुंबईसाठी अल्लाह गजफनर याने 2 विकेट्स मिळवल्या. तर ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.