आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 एप्रिल 2026
esakal April 30, 2026 10:45 AM

पंचांग -

गुरुवार : वैशाख शुद्ध १४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.०९ सूर्यास्त ६.५४, चंद्रोदय सायंकाळी ५.५२ चंद्रास्त पहाटे ५.३१, श्रीनृसिंह जयंती, पौर्णिमा प्रारंभ रात्री ९.१३, भारतीय सौर वैशाख १० शके १९४८.

दिनविशेष -

  • २०१२ - पुणे विद्यापीठात नॅशनल लॉ स्कूल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. अशा प्रकारचे लॉ स्कूल सुरू करणारे पुणे विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ ठरले.

  • २०१५ - महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.