पुण्यातील केमिकल कंपनीत गॅस गळती, 24 नागरिकांसह बचावकार्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकारी अन् जवानाला श्वसनाचा त्रास
शिवानी पांढरे April 30, 2026 11:13 AM

Pune Chemical Gas Leak:  पुणे शहरातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. या पुण्यातील एका केमिकल कंपनीत गॅस गळती (Chemical Gas Leak) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून यात 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती आहे. पुण्यातील (Pune News) गंगाधाम चौक परिसरात मध्यरात्री केमिकल कंपनीतील टाकीतून गॅस गळती झाल्याचे समोर आलं आहे. या गॅस गळतीमुळे जवळपास 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला असून सध्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान यातील काही जणांना रुग्णालया नेण्यात आला आहे. तर बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि एक जवानही उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सुमारे 30 जवानांनी बीए सेट परिधान करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सज्ज आहे. परिणामी आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, हि गॅस गळती नेमकी कशी झाली हे अद्याप कळू शकलं नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.