फडणवीसांचं एकूण बच्चू कडू गुवाहाटीला गेले होते, आता एकनाथ शिंदेंचं एकूण.... अंबादास दानवेंचा टोला 
सचिन गाड April 30, 2026 07:13 PM

Ambadas Danve on Bacchu Kadu : शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाविकास आघाडी वतीने मला उमेवारी देण्यात आली आहे. सर्व पक्षांनी एक मताने माझा फॉर्म भरल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली. निवडणूक बिनविरोध होईल अस वाटत आहे. नाराजी नाही, आमची आघाडी आहे. काही गोष्टींची स्पष्टता येणे काँग्रेसची भूमिका होती असेही दानवे म्हणाले. यावेळी दानवेंनी बच्चू कडू यांना देखील टोला लगावला. राजकारणात मिनिटा मिनिटाला गणिते बदलत असतात. बच्चू कडूंना गुवाहाटीला जाऊन 4 वर्ष झाली आहेत, तेव्हा फडणवीस यांनी सांगितले म्हणून गेले आता ते शिंदेंच एकूण गेलेत असा टोला दानवेंनी बच्चू कडू यांना लगावला. 

राजकारणात मिनिटा मिनिटाला गणिते बदलतात

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, काँग्रेस प्रभारी, प्रदेशाध्यक्ष यांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी आम्हाला सूचना दिली आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत. अशा पद्धतीने निश्चित भूमिका काँग्रेसने मांडली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि चेन्निथला यांच्यात लवकरच या संदभात बैठक होईल. संख्याबळ बघितले तर असं होण्याची शक्यता नाही. म्हणायला ते म्हणाले असतील. जो तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.पाच सहा वर्षपूर्वी नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला, तसा बच्चू कडू यांनी केला असेल. 

Harshvardhan Sapkal: ठाकरेंचा निर्णय महाविकास आघाडी म्हणून मान्य : हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपची भूमिका ही संविधान विरोधी भूमिका आहे. ⁠फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विरोधातील भाजपची भूमिका आहे. यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात लढलो. ⁠राज्यसभेवर शरद पवार यांना पाठवले. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, अशी सर्वांची भूमिका होती. मात्र, मी परत विधान परिषदेवर जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. सोनिया गांधी यांनी जसे पंतप्रधान होणार नाही, अशी भूमिका घेतली. तशीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. यात ⁠कोणाचा अनादर नाही. ⁠त्यांनी घेतलेला निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून आम्ही मानतो, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे हेच उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसची मविआसमोर मोठी अट  

दरम्यान, काँग्रेसने अंबादास दानवे यांना कोणत्या मुद्यावर पाठिंबा दिला? याबाबतची माहिती देखील समोर आली आहे. आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एका जागेवर काँग्रेस दावा करणार आहे. तर विधान परिषदेची एक जागा ठाकरे गटाला देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची अट मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, काँग्रेसच्या राज्यसभेच्या मागणीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.