Mamata Banerjee exit poll reaction 2026 : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी यांनी ‘एक्झिट पोल्स’बाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या अंदाजांवर विश्वास ठेवण्यास नकार देत, हे आकडे जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप केलाय.
निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानताना त्यांनी म्हटले की, कठीण परिस्थितीतही लोकांनी लोकशाहीची कास धरली. मतदारांनी दाखवलेल्या संयम आणि धैर्याचे त्यांनी कौतुक करत, याला लोकशाहीचा खरा विजय असल्याचे संबोधले.
केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोपभारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, निवडणुकांदरम्यान संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा वापरली गेली. केंद्रीय दलांची मोठ्या प्रमाणावर तैनाती करून राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. अमित शाह यांच्या निर्देशानुसार केंद्रीय दलांनी काम करत, ते भाजपचे हस्तक म्हणून वावरले. मतदार आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जनतेने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले.
Exit Poll Predictions 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? 'एक्झिट पोल'चे धक्कादायक आकडे, ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग? ‘एक्झिट पोल्स’वर अविश्वास‘एक्झिट पोल्स’बाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हे अंदाज वास्तवापासून दूर असून संभ्रम निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. भाजपच्या इशाऱ्यावर हे आकडे प्रसारित करून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला.
ममता बॅनर्जी यांनी मागील निवडणुकांची आठवण करून दिली. २०१४, २०१७ आणि २०२१ मध्येही ‘एक्झिट पोल्स’ चुकीचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळीही तृणमूल काँग्रेस २२६ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा? मतमोजणीवर लक्ष ठेवण्याचे आवाहनत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतमोजणी प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. गरज पडल्यास आपण स्वतःही त्या ठिकाणी उपस्थित राहू, असे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना शांत राहण्याचे व एकजूट राखण्याचे आवाहन केले आहे.