Vastu Shastra : तुम्ही देखील रात्रीच्या वेळी कपडे धुता? सावधान…, पहा वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?
Tv9 Marathi April 30, 2026 11:45 PM

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण होणार्‍या वास्तुदोषांवर उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या रोजच्या जीवनात नकळत अशा काही चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. जेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात विविध समस्या येण्यास सुरुवात होते. वास्तुदोषाचा प्रभाव वाढला तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात असं देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा घरात काहीही कारण नसताना अचानक भांडणं होणं, एखादं मोठं आर्थिक संकट येणं अशा समस्या तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. त्यामुळे घरात ऊर्जेचं संतुलन असणं गरजेचं असतं. अनेकांना रात्रीच्या वेळी कपडे धुण्याची सवय असते, मात्र ही सवय अत्यंत चुकीची आहे, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. रात्रीच्यावेळी कपडे धुणं हे वास्तुशास्त्रात अशुभ माण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

रात्रीच्यावेळी कपडे का धुवू नये?

वास्तुशास्त्रामध्ये रात्रीच्यावेळी कपडे धुने अशुभ माण्यात आलं आहे. जर तुम्ही दररोज रात्रीच्यावेळी कपडे धूत असाल तर त्यामुळे घरातील ऊर्जा संतुलन बिघडते, घरात नकारात्म ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार पाण्याचा संबंध हा चंद्राशी आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी जास्त पाणी सांडू नये, त्यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्र ग्रह कमजोर होतो. चंद्र ग्रह कमजोर झाल्यास तुमच्या आयुष्यात विविध समस्या येऊ शकतात. घरात गृहकलह वाढू शकतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे चुकूनही रात्रीच्यावेळी कपडले धुवू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

चंद्र कमजोर असल्यास काय करावं?

जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर त्यासाठी देखील वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र ग्रह कमजोर असेल तर तुम्ही चांदीच्या धातूपासून बनवलेलं कडं आपल्या हातात घालू शकतात. चांदीचा संबंध हा चंद्र ग्रहाशी आहे. तसेच दररोज रात्री चांदीच्या पेल्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्राशन करा, त्यामुळे देखील तुमच्या कुंडलीमधील चंद्र ग्रह मजबूत होण्यास मदत होते. तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र ग्रह कमजोर असतो, त्यांनी पाण्याची नासाडी कमीत कमी करावी असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.